कुठं खुर्चीसाठी मारामारी, तर कुठं भाषणावरनं फुगा फुगी

राजकारणाच्या खेळात तुमच्या सारखा स्वार्थ असला मंजी नेते मंडळीबी सरळ राहतील अन् प्रशासन पण.  

Updated: Oct 9, 2022, 12:00 AM IST
कुठं खुर्चीसाठी मारामारी, तर कुठं भाषणावरनं फुगा फुगी title=

तुषार तपासे, झी मीडिया, सातारा : आपल्या स्टाईल आणि स्टेटमेंटसाठी प्रसिद्ध असलेल्या खासदार उदयनराजे भोसलेंनी लोकप्रतिनिधींना त्यांची जागा दाखवलीय. लोकप्रतिनिधींवर नेमकं कशामुळे भडकले राजे आणि काम केली नाहीत तर जनता लोकप्रतिनिधी कुठं बसवणार हे राजेंनी थेट प्रात्याक्षिकच करून दाखवलं. त्यावरचा राजेंचा खास रिपोर्ट. (udayanraje angry on representatives of the people)

ऐकलं का? राजे लैय संतापल्यात. आता काय लोकप्रतिनिधींची खैर नाही. उदयनराजेंनी  थेट इशाराच दिलाय. राजे म्हणलं एकदिवस वाडगं हातात घ्यायची येळ इल. नुसतं म्हणलंयच नाय तर करुन बी दाखवलं. बघा की. नाद नाय करायचा राजेंचा. माईकसाठी फाईट करणारा राजा नाय तर वातावरण टाईट करणारा हाय दोस्ता.

उदयनराजे उठून परत माईककडं गेलं अन् स्वत:चा टीआरपीच सांगून टाकला. तीपण कॉलर उडवून. स्टाईल इज स्टाईल. अन् द्याट इज द्याट. उदयन राजे हाईत अन् कॉल उडणार नाय अस होणारच नाय. आपला राजा एकदम मोकळ्या मनाचा. जसा कंदी पेढा गोड तसाच उदयनराजेचा स्वभाव. 

खरं हाय महाराज आज काल स्वार्थीपणामुळं कुठं सत्ता आली तर कुठं सत्ता गेली. कुणाची खुर्ची राहिली तर तर कुणाची गेली. राजकारणाच्या खेळात तुमच्या सारखा स्वार्थ असला मंजी नेते मंडळीबी सरळ राहतील अन् प्रशासन पण.