निवडणूक आयोगाने चिन्ह गोठवताच ठाकरे गट म्हणतं आता हेच आमचं चिन्ह

धनुष्यबाण गेलं तर आता या चिन्हावर लढवू निवडणूक!

Updated: Oct 8, 2022, 11:29 PM IST
निवडणूक आयोगाने चिन्ह गोठवताच ठाकरे गट म्हणतं आता हेच आमचं चिन्ह  title=

मुंबई : ठाकरे गटाला निवडणूक आयोगाने मोठा धक्का दिला आहे, अंधेरी पोटनिवडणूकीसाठी (Andheri Bypoll Election) शिवसेनेचं चिन्ह गोठवण्यात आलं आहे. आता अंधेरी पोटनिवडणूकीमध्ये शिवसेनेला धनुष्यबाण चिन्हावर लढवता येणार नाही. त्यामुळे आता ठाकरे गटाची पुढची वाटचाल कशा प्रकारे आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अशातच शिंदेंच्या बंडानंतरही ठाकरेंची साथ देणारे उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांनी चिन्हाबाबत पोस्ट केली आहे. 

पोस्टमध्ये काय?
ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांनी, 'आमचे चिन्ह....उद्धव बाळासाहेब ठाकरे, असं म्हटलं आहे. कट्टर शिवसैनिकांनी पाटील आणि निंबाळकर यांच्या पोस्टला प्रतिसाद दिला आहे. शिवसैनिकांनी बंडखोर आमदारांवर निशाणा साधला आहे. 

 

 

शिवसेनेच्या धनुष्यबाणावर ठाकरे आणि शिंदे गटानं केलेल्या दाव्यांवर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या बैठकीत तब्बल चार तास चर्चा करण्यात आली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यासह इतर आयुक्त, निवडणूक चिन्ह प्रभारी, निवडणूक न्याय विभागाचे अधिकारी आणि महाराष्ट्र राज्य निवडणूक अधिकारी बैठकीला उपस्थित होते. शिंदे आणि ठाकरे गटानं काल कागदपत्रे सादर केली होती. 

आणखी कोणते पर्याय?
निवडणूक आयोगाने जारी केलेल्या निवडणूक मुक्त चिन्हांमध्ये 197 मुक्त चिन्हांचा समावेश आहे. यात एअर कंडीशनर, दुर्बीण, कॅन, बिस्कीट, कपाट, सफरचंद, नारळाची बाग, कॅमेरा, ड्रील मशीन, हेलिकॉप्टर, कडी, भुईमूग, गॅस शिगडी, भेटवस्तू, खाट, सेफ्टी पीन, विहीर, भालाफेक, लिफाफा, चिमटा, जहाज, झोपाळा, टूथ ब्रश, टूथ पेस्ट, फणस, ग्रामोफोन, आइस्क्रीम, पॉकीट, ट्रक, चावी, चप्पल, बॅटरी टॉर्च, गॅस शेगडी आदी चिन्हांचा समावेश आहे.