मौज-मजा जिवावर बेतली, धरणात दोन तरुण बुडाले

Two youths drowned in the barrage dam : मौज-मजा करण्यासाठी गेलेले दोन तरुण धरणात बुडालेत. चोवीस तासानंतर दोघांचे मृतदेह हाती लागलेत.  

Updated: Aug 2, 2022, 10:05 AM IST
मौज-मजा जिवावर बेतली, धरणात दोन तरुण बुडाले  title=

बदलापूर :  Two youths drowned in the barrage dam : मौज-मजा करण्यासाठी गेलेले दोन तरुण धरणात बुडालेत. चोवीस तासानंतर दोघांचे मृतदेह हाती लागलेत. बॅरेज धरणात दोन तरुण पोहोण्यासाठी उतारले होते. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्यानेत ते दोघ बुडालेत. अग्निशमन दलाने शोधमोहीम हाती घतेली आणि त्यानंतर चोवीस तासानंतर या दोघांचे मृतदेह मिळाले.

रविवारी संध्याकाळी बदलापूरच्या बॅरेज धरण परिसरात उल्हासनगर येथील मानेरे गावातील आठ तरुण पोहोण्यासाठी आले होते, या तरुणांपैकी देवेंद्र यादव (24) आणि रोहन वानखेडे (34) या दोघांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले . बॅरेज धरणात दोन तरुण बुडाल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली होती. त्यानुसार अग्निशमन दलाने तातडीने शोधमोहीम हाती घेतली. मात्र अंधार असल्याने रात्री ९ वा. ही शोधमोहीम थांबवण्यात आली.

 त्यानंतर सोमवारी सकाळपासून सुरु असलेल्या या शोध मोहिमेत घेण्यात आली. त्यापैकी रोहनचा मृतदेह सोमवारी काल संध्याकाळी पावणेसहाच्या सुमारास हाती लागला, तर देवेंद्रचा मृतदेह रात्री आठ वाजण्याच्या सुमारास वालीवली येथील पुलाखाली आढळून आला. बॅरेज धरण परिसरात गेल्या आठ दिवसात तीन जणांचा बुडून मृत्यू झाला आहे.