जादुटोण्याच्या संशयातून इसमाची धारदार शस्त्रांनी हत्या

वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर  तालुक्यात परसोडी येथे जादुटोण्याच्या संशयातून इसमाची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतलं आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.

Updated: Feb 7, 2018, 05:16 PM IST
जादुटोण्याच्या संशयातून इसमाची धारदार शस्त्रांनी हत्या title=

वर्धा : वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर  तालुक्यात परसोडी येथे जादुटोण्याच्या संशयातून इसमाची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतलं आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.

धारदार शस्त्रांनी वार

वासुदेव नैकाम सोमवारी रात्री शेतात राखणदारीसाठी गेले होते. रात्री उशीरापर्यंत घरी न पोहचल्याने ते रात्री  शेतातच थांबल्याचा समज घरच्यांचा झाला.  सकाळी त्यांचा मृतदेहच शिवारातील रस्त्यावर आढळला. धारदार शस्त्रांनी वार करून वासुदेव नैताम यांची अज्ञातांनी हत्या केल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून चौकशी  सुरू केली. 

का केली हत्या?

चौकशीदरम्यान, मंगेश पेंदाम आणि आकाश पेंदाम या दोघांनी जादुटोण्याच्या संशयावरून वासुदेव नैताम यांची हत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली.  पोलिसांनी मंगेश आणि आकाश पेंदामला ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, या घटनेमुळं परिसरात चांगलीच खळबळ माजलीय.