एमेराल्ड हाईट्स शाळेत विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण

नाशिक शहरात एमेराल्ड हाईट्स या शाळेत विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण झाल्याचं उघड झालंय. त्यामुळे संतप्त नागरिकांनी शाळा बंद पाडली आहे.

Updated: Feb 7, 2018, 06:22 PM IST
एमेराल्ड हाईट्स शाळेत विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण title=

नाशिक : नाशिक शहरात एमेराल्ड हाईट्स या शाळेत विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण झाल्याचं उघड झालंय. त्यामुळे संतप्त नागरिकांनी शाळा बंद पाडली आहे.

शाळेवर कोणतीही कारवाई नाही

मात्र हा प्रकार समोर येऊनही या शाळेवर अजून कोणतीही कारवाई झाल्यामुळे संतापलेल्या पालकांनी शाळा बंद करण्याचा प्रकार घडलाय. आज संतप्त पालकांनी शाळेसमोर येत आपली नाराजी व्यक्त केली.

आणखीही मुलांना मारहाण

दरम्यान, आता मुख्याध्यापिकेच्या विक्षिप्त वागण्याच्या आणखीही कहाण्या पुढे येत आहेत. मारहाण झालेले आणखी विद्यार्थी पुढे येत आहेत. फी भरली नाही म्हणून परीक्षेलाही बसू न देण्याचा प्रकारही मुख्याध्यापिका जयश्री रोडे हिनं केल्याची माहिती हाती आलीये. दोन मुलांनी केलेल्या तक्रारीनंतर मुख्याध्यापिकेला अटक झालीये.