राज्यात आणखी दोन धक्कादायक घटना, अल्पवयीन मुलगी आणि शेतकऱ्याची आत्महत्या

Suicide News : राज्यात ( Maharashtra) अत्याचारांच्या घटनांत वाढ होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.  

Updated: Sep 11, 2021, 01:43 PM IST
राज्यात आणखी दोन धक्कादायक घटना, अल्पवयीन मुलगी आणि शेतकऱ्याची आत्महत्या  title=
संग्रहित छाया

मुंबई :  Suicide News : राज्यात ( Maharashtra) अत्याचारांच्या घटनांत वाढ होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. पुण्यातील घटनेनंतर मुंबईतही महिलेवर बलात्कार करण्यात आला. त्यानंतर गंभीर जखमी पीडितेचा राजावाडी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. आता आणखी एक धक्कादायक घटना पुढे आलेय. अमरावतीमध्ये अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली आहे. ( minor girl suicide in Amravati) अल्पवयीन मुलीवर बळजबरी केल्यानंतर तिने टोकाचे पाऊल उचलले. तर दुसरीकडे बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात तरुण शेतकऱ्याने आत्महत्या  केली. (farmer suicide in Beed)

मृत्यूशी झुंज देणाऱ्या मुंबईतील निर्भयाचे रुग्णालयात निधन

गळफास लावून संपवलं जीवन

अमरावतीत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटना थांबता थांबत नाहीत. पुन्हा एकदा दर्यापूर तालुक्यातील येवदा पोलीस स्टेशन अंतर्गत एका अल्पवयीन मुलीशी नराधमाने बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले. यातून अल्पवयीन मुलगी  सात महिन्याची गर्भवती राहीली. तिने बदनामीच्या भीतीने तिने गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी येवदा पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बीडमध्ये तरुण शेतकऱ्याची आत्महत्या 

गेवराई तालुक्यातील मारफळा येथील एका तरुण शेतक-यानं आत्महत्या केली. विलास माने असे या शेतकऱ्याचं नाव आहे. अतिवृष्टीमुळे या शेतकऱ्याचं मोठे नुकान झाले. शेतीसाठी त्याने सरकारी बँका तसंच खासगी कर्ज घेतले होते मात्र पावसाने पिकाची नासाडी झाली. घेतलेलं कर्ज कसं फेडायचं या चिंतेत त्यानं गळफास लावून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.