हिरवागार कोकण, एक झलक! सुखून की जिंदगी...

कोकण पर्यटन करण्यासाठी तुम्ही जात असाल तर या ठिकाणी अवश्य भेट द्या आणि सुखून की जिंदगी... काय असते ते अनुभवा.

Updated: Sep 21, 2021, 11:16 AM IST
हिरवागार कोकण, एक झलक! सुखून की जिंदगी...	 title=
Pic Courtesy: youtube

मुंबई : Konkan Mini Water Fall : कोकणचा 'कॅलिफोर्निया' करण्याची अनेकवेळा घोषणा झाली. मात्र, कोकणचा विकास ( Konkan Development) म्हणावा तसा झाला नाही. रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनातून विकास केला तर रोजगार तर मिळेल आणि विकासाला अधिक चालना मिळेल. कोकण पर्यटनाला चालना देण्यासाठी छोट्या-छोट्या गोष्टींना प्राधान्य दिले पाहिजे. हे सांगण्याचे कारण की, रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीतील हे ठिकाण पाहिले तर ते लक्षात येते. कोकण म्हटले की डोळ्यासमोर उभा राहतो हिरवागार निसर्ग. या हिरव्यागार निसर्गात काय काय दडलंय याचा शोध घेण्याचा हा प्रयत्न...कोकण पर्यटन करण्यासाठी तुम्ही जात असाल तर या ठिकाणी अवश्य भेट द्या आणि सुखून की जिंदगी... काय असते ते अनुभवा.

दापोली शहरापासून बरोबर पाच किलोमीटर अंतरावर चंदननगर येथील हा धबधबा आहे. हा मिनी वॉटर फॉल (Mini Water Fall) म्हणून ओळखला जातो. मात्र, हा फारसा कोणाच्या नजरेत पडलेला नाही. दापोली - लाडघर मार्गावर असलेल्या या धबधब्यावर पोहोचण्यासाठी अर्धा तास लागतो. 100 मीटरची पायवाट तुडवल्यानंतर येथे तुम्हाला ट्रेकचा अनुभवदेखील या धबधब्याकडे जाताना मिळतो. 

अतिशय सुंदर असा हा धबधबा तसा दुर्लक्षितच आहे. यापर्यंत पोहोचण्यासाठी रस्ता देखील सुस्थितीत करण्यात आलेला नाही. पण विकेंड एन्जॉय करण्यासाठी हा धबधबा अतिशय चांगला पर्याय आहे. हा धबधबा सुरक्षित सुद्धा आहे. येथे धोका नाही. मात्र, पर्यटतातून विकास गेला तर याच्या सौंदर्यात अधिक भर पडले.

दरम्यान, सध्या कोरोनाचा धोका आहे. कोविड-19चे नियम लागू असल्यामुळे ग्रामपंचायतीने तिथल्या पाण्यामध्ये न जाण्याचा सल्ला दिला आहे. तसेच कोणीही स्नान करु नये, अशी सूचना पर्यटकांना दिली आहे.