कोल्हापूरात स्फोटकांनी भरलेल्या आणखी ३ पिशव्या सापडल्या

कोल्हापुरात उजळाईवाडी उड्डाणपूल स्फोटकांचं गूढ वाढले 

Updated: Oct 20, 2019, 10:55 AM IST
कोल्हापूरात स्फोटकांनी भरलेल्या आणखी ३ पिशव्या सापडल्या  title=

कोल्हापूर : कोल्हापुरात उजळाईवाडी उड्डाणपूल स्फोटकांचं गूढ वाढले आहे. काल झालेल्या स्फोटानंतर आता परिसरातल्या नाल्यात स्फोटकांनी भरलेल्या आणखी ३ पिशव्या सापडल्या आहेत. बॉम्बशोधक पथकाने ही स्फोटकं हस्तगत करून चाचणीसाठी पाठवली आहेत. 

काल उजळाईवाडी उड्डाण पूलाखाली झालेल्या स्फोटात ट्रक चालक दत्तात्रय पाटील यांचा मृत्यू झाला होता. पोलिसांना उजळाईवाडी उड्डाण पूलाजवळ शोधमोहीम राबवत नाल्यात लपवलेली आणखी स्फोटकं हस्तगत केली. पोलिसांचा तपास ट्रक चालक दत्तात्रय पाटील आणि त्याच्या मित्रभोवती केंद्रीत झाला आहे.