त्र्यंबकेश्वर मंदिराचे कर्मचारीही संपावर

 या मंदिरात एकूण १४२ कर्मचारी असून त्यात सहा अधिकारी दर्जाचे आहेत. यापैकी १३६ कर्मचाऱ्यांनी संप पुकारलाय. 

Updated: Jan 9, 2019, 10:38 AM IST
त्र्यंबकेश्वर मंदिराचे कर्मचारीही संपावर  title=

त्र्यंबकेश्वर : देशपातळीवर कामगार कर्मचाऱ्याच्या संपामुळे सरकारी यंत्रणेवर मोठा ताण पडत आहे. कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम असल्याने सामान्य नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. महाराष्ट्रातही बॅंक कर्मचारी, बेस्ट कर्मचारी संपावर आहेत. संपाचा हा तिढा सुटण्याची चिन्हे तुर्तास तरी दिसत नाहीत. यामध्ये आता त्र्यंबकेश्वर मंदिर प्रशासनाचे कर्मचारीही सहभागी झाले आहेत. या संपामुळे आता भक्त आणि देवाच्या भेटीतही अडचणी निर्माण होतानाचे चित्र समोर येतंय.

१३६ कर्मचाऱ्यारी संपावर 

देशभरामध्ये पुकारलेल्या संपात त्र्यंबकेश्वर देवस्थानाचे कर्मचारीही संपावर गेलेत. या मंदिरात एकूण १४२ कर्मचारी असून त्यात सहा अधिकारी दर्जाचे आहेत. यापैकी १३६ कर्मचाऱ्यांनी संप पुकारलाय. त्यामुळे केवळ सहा अधिकारी दरवाज्यासह तिकीट घर आणि व्यवस्थापन सांभाळत आहेत. 

भाविकांना त्रास 

 लाल बावटा म्हणजेच डाव्यांच्या संघटनेत मंदिर सुरक्षा कर्मचारी संघटना उतरल्याने आश्चर्य व्यक्त होतंय. भाविकांना या संपाचा त्रास सहन करावा लागत आहे. सुधारित वेतन करार, सानुग्रह अनुदान सेवेत कायम स्वरुपी करणे अशा विविध मागण्यासाठी त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे कर्मचारी हे संपावर आहेत.