Video : पुणे बंद राहिलं बाजूला, सर्वत्र 'त्या' महिलेचीच चर्चा

Viral Video : चर्चा तर होणार ना राव, कारण पुणे आणि त्यात ती महिला मग पुणे बंद दरम्यानचा त्या महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतो आहे.

Updated: Dec 14, 2022, 08:54 AM IST
Video : पुणे बंद राहिलं बाजूला, सर्वत्र 'त्या' महिलेचीच चर्चा title=
Trending Video Pune Bandh woman refusing to close shop goes viral on Social media nmp

Pune Bandh Trending Video : सोशल मीडियाने (Social media) च्या जगात एखादी घटना किंवा व्यक्ती क्षणात प्रसिद्ध होते. इंटरनेटवर एका महिलेचा व्हिडिओ (woman video) सर्वत्र चर्चाचा विषय बनला आहे. पुणे तिथे का उणे, असंच काहीस हे प्रकरण...मंगळवारी शिवप्रेमी संघटनांकडून पुणे बंदची (Pune Bandh) हाक देण्यात आली होती. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari) यांच्यासह विविध राजकीय नेत्यांकडून होत असलेल्या महापुरुषांच्या अवमानाचा निषेध करण्यासाठी हा बंद पुकारण्यात आला होता. 

बंद राहिला बाजूला 'या' महिलेचीच चर्चा

पुणे बंदची हाक दिल्यामुळे (Maharashtra News in Marathi) अनेक सेवा बंद होत्या. तर अत्यावश्यक सेवा वगळता सगळे व्यवहार ठप्प झाले होते. शिवप्रेमी संघटनांचे कार्यकर्त्ये शहरात फिरून फिरुन घोषणाबाजी करत होते. शिवाय ज्या लोकांची दुकाने उघडी दिसली त्यांना ठणकावून दुकान जबरदस्ती बंद करण्यास सांगत होते. असंच काही कार्यकर्ते एका दुकानावर पोहोचले आणि तिथे त्यांनी दुकान बंद करण्यास सांगिल्यावर जे काही घडलं ते आश्चर्यकारक होतं. (Trending Video Pune Bandh woman refusing to close shop goes viral on Social media)

 

हेसुद्धा - Video : एका मुलासाठी दोन तरुणींची रस्त्यावर जोरदार हाणामारी, पाहा पुढे काय झालं ते...

 

'ती' एक महिला पडली भारी

हे दुकान एका महिलेचं होतं. कार्यकर्ते दुकान बंद करण्यास सांगत आहे, तेव्हा त्या महिलेनं मात्र दुकान बंद ठेवणार नाही असं ठणकावून सांगितलं. एवढंच नव्हे तर एक तरी महाराजांचा गुण घ्या, महाराज अशी दादागिरी करत नव्हते असा सल्लाही दिला. या महिलेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

पुणे बंदला उत्तम प्रतिसाद

दरम्यान पुणे बंदला उत्तम प्रतिसाद मिळाला. बंद दरम्यान फर्ग्युसन रस्त्यावर शुकशुकाट दिसून आला. मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात महिलांची संख्या दिसून आली आहे. मात्र ती एक महिला या पुणे बंददरम्यान सोशल मीडियावर प्रसिद्ध झाली.