Rajan Salvi : ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी आज एसीबीसमोर राहणार हजर

  Rajan Salvi Inquiry : राजापूरचे आमदार राजन साळवी ( Rajan Salvi ) यांची आज चौकशी करण्यात येणार आहे.  

Updated: Dec 14, 2022, 09:27 AM IST
Rajan Salvi : ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी आज एसीबीसमोर राहणार हजर  title=
MLA Rajan Salvi Property Inquiry

 MLA Rajan Salvi Property Inquiry : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) राजापूरचे आमदार राजन साळवी ( Rajan Salvi ) आज अलिबाग एसीबीसमोर हजर राहणार आहेत. साळवी यांच्या मालमत्तेची चौकशी करण्यात येणार आहे. त्यामुळे साळवी यांची मालमत्ता उघड होणार आहे. (Maharashtra Political News)

शिवसेना ठाकरे गटाचे राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी नोटीस पाठविण्यात आली होती. त्यानंतर आज लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी होणार आहे. आज दुपारी 12 वाजता आमदार साळवी रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील एसीबी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार आहेत.

 ( हेही वाचा - 'धनुष्यबाणा'साठी ठाकरे गट पुन्हा दिल्ली उच्च न्यायालयात )

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात साळवी यांना एसीबीची नोटीस आली होती. मात्र राजन साळवींनी यासाठी वेळ मागून घेतली होती. त्यानुसार आज ते चौकशीसाठी हजर राहणार आहेत. यावेळी ठाकरे गटाकडून शक्ती प्रदर्शन होण्याची शक्यता आहे. यापूर्वी सिंधुदुर्गचे आमदार वैभव नाईक यांचीही एसीबी मार्फत चौकशी झाली होती.

दरम्यान, आपल्यावर चौकशी करण्याच्या नावाखाली दबाव आणण्यात येत आहे. कितीही काही झाले तरी आपण ठाकरे गटासोबतच राहणार आहोत. आपण सच्चे शिवसैनिक आहोत, असे राजन साळवी यांनी रत्नागिरीत पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिले आहे. राजन साळवी हे शिंदे गटात जाणार असे वृत्त होते. यावर त्यांनी मौन सोडत आपण बाळासाहेब ठाकरे यांचे कार्यकर्ते आहोत. आपण ठाकरे गटाशी एकनिष्ठ आहोत. आम्हाला निष्ठा कोणीही शिकवू नये, असे आव्हानही राजन साळवी यांनी विरोधकांना दिले होते.