Pet Dog Beating Viral Video : अनेकांना घरामध्ये पाळीव प्राणी ठेवतात. श्वान, पोपट, मांजरीशिवाय कासवही पाळले जातात. श्वानचं किती गोड आणि क्यूट असतात. श्वानाला माणसाचे खरे मित्र म्हटलं जातं. श्वानांचा मालकावर हल्ल्याच्या अनेक घटना गेल्या काही दिवसांमध्ये समोर आल्या. त्यात श्वानाने मालकाचा जीव वाचवल्या अशाही अनेक घटना आहेत. पण एका धक्कादायक व्हिडीओने नेटकरी हैराण झाले आहेत.
पुण्यातील त्या बिल्डिंगमधील गॅलरीतून दिवसरात्र एका श्वानाचा ओरडण्याचा आणि वेदनादायी आवाज येत राहायचा...पावसाळा असो किंवा हिवाळा त्या गॅलरीत एक श्वान कायम साखळीच्या बेड्यात बांधलेला असायचा...त्या श्वानाचा वेदनादायी आवाज आजूबाजूच्या लोकांच्या कानावर पडतं होता. त्या श्वानाचा असाह्य आवाजाचा एक व्हिडीओ कोणीतरी बनला आणि प्राणीमित्रांकडे या प्रकरणाची तक्रार केली. (dog beaten)
त्यानंतर एका प्राणीमित्र संस्थेचे तरुण तरुणी त्या व्यक्तीच्या घरी पोहोचले. तेव्हा धक्कादायक घटना समोर आली. मालक रोज तिला मारहाण करतो होतो. तिला फिरायला देखील घेऊन जात नव्हता. तिला कायम घरातील गॅलरीत एकाच ठिकाणी बांधून ठेवलं जायचं. (trending video owner Inhumane beating pet dog rescue video viral on Social media Pune news)
या प्राणीमित्रांच्या अथक प्रयत्ना नंतर तिची निदर्यी मालकापासून सुटका करण्यात आली. तिचं नाव डूडल असून ती अंदाजे 6 महिन्यांची आहे.
हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर saahasforpune यावर शेअर करण्यात आला आहे. डूडलची सुटका झाल्यावर तिचा आनंद दिसून येतं होता. श्वानासोबत हा अमानुष मारहाणीचा प्रकार संस्कृत पुण्यात घडला आहे.
दरम्यान काही वर्षांपूर्वी अशी एक धक्कादायक घटना समोर आली होती. नाशिकमध्ये मालक त्यांचा पाळीव श्वानाला रागात सिगरेटचे चटके द्यायचा. त्या व्यक्तीच्या भावाने आक्षेप घेतल्यास त्यालाही त्या व्यक्तीने मारहाण केली. त्याने पोलिसात तक्रार केली.
गेल्या वर्षी एका डॉक्टरने क्रूरतेचा कळस केला होता. निष्पाप कुत्र्याला त्याने गाडीला बांधून फरफटत नेले होते. तब्बल पाच किलोमीटर पर्यंत हा अमानुष प्रकार सुरु होता.
राजस्थानच्या जोधपूरमधील (Jodhpur) एक डॉक्टर (doctor) ने हे संतापजनक कृत्य केलं होतं. डॉक्टर रजनीश गालवा ( Dr. Rajneesh Galwa) असं त्यांच नाव होतं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
भला कोई इतना निर्दयी कैसे हो सकता है? pic.twitter.com/DQ06qSSKvk
— Harshul Mehra/हर्षुल मेहरा (@mehra_harshul) September 18, 2022
या घटनेचा व्हिडीओ ट्वीटरवर Harshul Mehra/हर्षुल मेहरा याने पोस्ट केला होता. त्यानंतर ही घटना समोर आली. या व्हिडीओची दखल खुद्द मनेका गांधी (maneka gandhi) यांनी घेतली आणि पोलिसांकडे तक्रार केली होती.