प्रताप नाईक, झी मीडीया, सातारा : सातारा वनविभागाने 'गिरे तो भी टांग उपर' या उक्तीप्रमाणे वृक्षलागवड घोटाळ्यात काहीच न झाल्याचा दावा केलाय. सर्व कामं रितसर झाल्याचा दावा करत वनमंत्र्यांच्याच डोळ्यात धुळफेक करण्याचा प्रयत्न वनविभागाने चालवलाय.
झी मीडियाने सातारा वनविभागातील भ्रष्टाचार पुराव्यानिशी दाखवला होता. त्यानुसार झाडं लावण्यासाठी खणलेले खड्डे रितसर नदीकाठच्या गाळाच्या मातीने आणि शेणखताने भरले नाहीत. त्याचबरोबर झाडं लावण्यासाठी खड्डे मजुराकरवी न खोदता जेसीबीनं खोदून बोगस मजुरांच्या नावे पैसे उकळल्याचंही झी मीडियाने समोर आणलंय.
कोल्हापूर, सांगली आणि सातारा वनविभागाच्या वृक्षलागवडीच्या कामात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याची बातमी झी मिडीयानं पुरावण्यानिशी दाखवुन वनविभागाची पोलखोल केली. त्यानंतर कोल्हापूर मुख्यवनसंरक्षक यांनी तीनही जिल्ह्यात झालेल्या कामाची तपासणी लावली. ही तपासणी सुरु असतानाच, सातारा वनविभागाच्या अधिका-यांनी गीरे तो भी टांग उपर या उक्तीप्रमाणं कृती करुन एक व्हिडिओ व्हायरल करुन वनमंत्र्यांच्या डोळ्यात फेकण्याचा प्रयत्न केलाय.
सातारा वनविभागाच्या अधिका-यांनी केलेला हा दावा किती खोटा आहे, हे सातारा वनविभागाच्या कर्मचा-याकडूनच ऐकायला मिळालं.
कारवाई टाळण्यासाठी अधिका-यांनी व्हिडीओ तयार करुन तो व्हायरल करण्याचा प्रयत्न केलाय. पण प्रत्यक्षात खड्डे खुदाईचं काम कस झालय, जागेवर असणारा वनकर्मचारीच सांगतोय.
सातारा जिल्ह्याचे उपवनसंरक्षक, ए.एम. अंजनकर, सातारा RFOएम. एस. पाटील हे जबाबदार अधिकारी सर्व काम रितसर झाली असल्याचा दावा व्हिडिओमध्ये करत आहेत. त्याचबरोबर या भागात सर्वत्र हार्ड रॉक असल्याचं सांगुन सर्वांच्याच डोळ्यात धुळ फेकण्याचा प्रयत्न करत आहेत. वास्तवीक वनविभागाचे कर्मचारीच खोदलेले प्रत्येक खड्डे हे हार्ड़ रॉक असल्याचं मानायला तयार नाहीत.
कारवाई होणार या भितीनं सातारा वनविभागाच्या अधिका-यांनी घाई गडबडीनं व्हिडिओ तयार करुन, तो मी नव्हेचा आव आणलाय.... त्याचा हा दावा वनविभागाच्याच कर्मचा-यांनीच झी मीडीयाशी बोलताना खोडून काढलाय.
किमान आता तरी वनमंत्र्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेवुन थर्ड पार्टी ऑडीट करावं अन्यथा वर्षानुवर्षे हे अधिकारी अशाच पद्धतीन बेजबाबदार वागुन शासनाचे पैसे लाटत राहातील.
वनमंत्र्यांच्याच डोळ्यात धुळफेकीचा प्रयत्न