उदयनराजे म्हणतात, टायगर अभी जिंदा है

नेहमीच दबंगगिरीसाठी चर्चेत असलेले साताऱ्याचे राष्ट्रवादीचे  खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यांचेच बंधु आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर जोरदार टीका केलीय.

Updated: Apr 7, 2018, 11:40 PM IST
उदयनराजे म्हणतात, टायगर अभी जिंदा है title=

सातारा : नेहमीच दबंगगिरीसाठी चर्चेत असलेले साताऱ्याचे राष्ट्रवादीचे  खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यांचेच बंधु आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर जोरदार टीका केलीय.

शर्टची कॉलर वर करत... 'टायगर अभी जिंदा है' म्हणत... मी कुठेही जाणार नाही, इथूनच लढणार म्हणत लोकसभेच्या निवडणुकांसाठी उदयनराजे यांनी रणशिंग फुंकलंय. 

सातारा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या कास धरणाची ऊंची वाढवण्याचं काम सुरु असून याची पहाणी खासादार उदयनराजे भोसले यांनी केली. यावेळी विरोधकांना उदयनराजेंनी चांगलाच टोला लगावला.