खारघर तलावात तिघे बुडाले, १ मृत

नवी मुंबईतल्या खारघर मधील तळोजा कारागृहाबाहेरील तलावात ३ जणं बुडालेत.

Updated: Jun 25, 2018, 09:17 AM IST
खारघर तलावात तिघे बुडाले, १ मृत  title=

नवी मुंबई : नवी मुंबईतल्या खारघर मधील तळोजा कारागृहाबाहेरील तलावात ३ जणं बुडालेत.. त्यातील एकाचा मृतदेह सापडला असून दोघांचा शोध सुरु आहे. फैजान नसर सिद्धीकी, रेहान कमर सिद्धीकी आणि आबिद सिद्धीकी अशी या तिघांची नावं आहेत.. हे तिघेही तळोजा वसाहतीमधील रहिवासी होते.. हे तिघेही कारागृहासमोरील तलावाजवळ बसले होते.. यावेळी डोंगरावरुन पाण्याचा प्रचंड प्रवाह आल्यानं तिघेही वाहून गेले.

शोधकार्य सुरू

पोलीस आणि अग्निशमन दलाच्या सहाय्यानं शोधकार्य सुरु करण्यात आलंय.. रात्री ८च्या सुमारास एकाचा मृतदेह सापडला असून अन्य दोघांचा शोध सुरु आहे.