30 लाखांची खंडणी, पेढे व्यावसायिकाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी

Threat call News : चक्क पेढे व्यापाऱ्याकडे खंडणीची मागणी करण्यात आली आहे.  

Updated: Nov 17, 2021, 01:15 PM IST
30 लाखांची खंडणी, पेढे व्यावसायिकाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी  title=

सातारा : Threat call News :चक्क पेढे व्यापाऱ्याकडे खंडणीची मागणी करण्यात आली आहे. (Demand Ransom from the Trader) साताऱ्यातील (Satara ) एका पेढ्याच्या व्यावसायिकाला धमकीचे मेसेज आले आहेत. या धमकीच्या मेसेजमध्ये 30 लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे. 30 लाख रुपये दे नाही तर बॉम्बने उडवू, अशी धमकी देण्यात आली आहे. परदेशातून हा धमकीचा कॉल आला असल्याचे सांगण्यात येत आहे. (Threats to Pedha Sweet Merchant in Satara )

पेढे व्यापाऱ्याला धमकी देताना म्हटले की, '30 लाख दो, या बम से उडा देंगे'. ही धमकी वेगवेगळ्या नंबरवरून संबंधित व्यावसायिकाला देण्यात आली आहे. तसेच फोन देखील त्याला येत आहेत. '30 लाख दो या बम से उडा देंगे, Nimbkar ISI PAK,  असा हा मेसेज या व्यावसायिकाला आला आहे. त्यानंतर हे प्रकरण पोलिसात गेले आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत. ( Satara Pedha sweet maker got Threat call) जिल्ह्यातील आणखीन काही व्यापाऱ्याना देखील अशा पद्धतीने धमक्या देण्यात आल्या आहेत. 

गेल्या आठ दिवसापासून परदेशातून कॉल येत आहेत. सुरुवातील या धमकीकडे या व्यापाऱ्यांने दुर्लक्ष केले. मात्र, त्यानंतर रात्री कधीही धकमीचे कॉल येऊ लागलेत. यावेळी तीस लाख रुपयांची मागणीही करण्यात आली.या धमकीनंतर सातारा पोलीस मुख्यलयाला ई-मेलद्वारे तक्रार नोंदविण्यात आली आहे. या तक्रार अर्जात आलेले फोन क्रमांक, स्क्रीन शॉट देखील जोडण्यात आले आहेत. दोन वेगवेगळ्या नंबरवरुन धमकी देण्यात येत आहे.

सातार्‍यातील मिठाई व्यवसायिकाला गेल्या 8 दिवसांपासून इंटरनॅशनल कॉल येत असून 30 लाख रुपयांची खंडणी ची मागणी केली जातीये पैसे न दिल्यास बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून याप्रकरणी पोलिस मुख्यालयात तक्रार अर्ज देण्यात आला आहे.

सातारा पोलिसांना मेल पाठवल्यानंतर मंगळवारी प्रशांत मोदी यांनी सायबर पोलीस ठाण्यात जावून घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांना दिली. सातारा पोलिसांनी सर्व माहिती घेवून तपासाला सुरुवात केली असून सर्व अंगाने याचा तपास केला जाणार आहे. साताऱ्यातील व्यावसायिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन सातारा सायबर सेलचे पोलीस निरीक्षक  नवनाथ घोगरे  यांनी केले आहे.