रिक्षाप्रवास महागला, पहिल्या दीड किलोमीटरसाठी आता 21 रूपये

Rickshaw travel News :  रिक्षाप्रवास महागला आहे. पुण्यात (pune) अखेर रिक्षा भाडेवाढीला मंजुरी देण्यात आली आहे. 

Updated: Nov 17, 2021, 10:22 AM IST
रिक्षाप्रवास महागला, पहिल्या दीड किलोमीटरसाठी आता 21 रूपये  title=
संग्रहित छाया

पुणे : Rickshaw travel News : महागाईत सातत्याने भर पडत आहे. पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर महागाई वाढताना दिसत आहे. आता पुणेकरांचा रिक्षाप्रवास महागला आहे. पुण्यात (pune) अखेर रिक्षा भाडेवाढीला (Rickshaw fare hike) मंजुरी देण्यात आली आहे. (Rickshaw travel is expensive in Pune city)

पुण्यात पहिल्या दीड किलोमीटरसाठी 18 ऐवजी 21 रूपये मोजावे लागणार आहेत. तर पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी साडेबारा रूपयांऐवजी 14 रूपये द्यावे लागतील. परिवहन अधिकाऱ्यांनी भाडेवाढीला मंजुरी दिली आहे. येत्या 22 नोव्हेंबरपासून ही नवी दरवाढ लागू होईल. 

बेशिस्त रिक्षावाले, कारवाईचा बडगा 

दरम्यान, मुंबईत घाटकोपर रेल्वे स्टेशनबाहेर पोलिसांनी धडक कारवाई करत, अवैध रिक्षाचालक आणि फेरीवाल्यांना हुसकावून लावले. घाटकोपर रेल्वे स्टेशन पश्चिमेला बाहेर येताच बेशिस्त रिक्षावाले आणि अवैध फेरीवाल्यांचा त्रास असतो. म्हणून ही कारवाई करण्यात आली. मात्र तात्पुरत्या कारवाईनंतर पुन्हा फेरीवाले आणि इतर आपलं बस्तान मांडतात हा अनुभव आहे.