आमदार रमेश कदम याची जेलमध्ये शाही बडदास्त

अण्णाभाऊ साठे महामंडळातील भ्रष्टाचार प्रकरणी अटकेत असलेल्या आमदार रमेश कदम यांना बीडच्या न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली,मात्र बीड पोलिसांनी त्यांची शाही बडदास्त ठेवल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

Updated: Jul 20, 2017, 04:05 PM IST
आमदार रमेश कदम याची जेलमध्ये शाही बडदास्त title=

बीड : अण्णाभाऊ साठे महामंडळातील भ्रष्टाचार प्रकरणी अटकेत असलेल्या आमदार रमेश कदम यांना बीडच्या न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली,मात्र बीड पोलिसांनी त्यांची शाही बडदास्त ठेवल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

पोलिसांनी शाही बडदास्त ठेवली असून शासकीय विश्रामगृहावर झोपण्यासाठी आणि अंघोळी साठी त्यांना मुभा देण्यात आली होती,आरोपी असणारे कदम हे विश्रामगृहाच्या पायऱ्या उतरताना स्पष्ट दिसत आहेत. आरोपीला जर व्ही व्ही आय पी वागणूक पोलीसच देऊ लागले तर कायदा सुव्यवस्था कशी अबाधित राहणार असा सवाल उपस्थित होत आहे.

आरोपी आमदार कदम हे पोलीस लॉकपमध्ये न राहता विश्रामगृहावर कसे गेले याची चौकशी होऊन संबधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आलाय.