सरकारने शेतकऱ्यांच्या हाती दिली आरोपींसारखी पाटी

अवकाळी पावसानं नुकासन झालेल्या शेतकऱ्यांच्या शेताचे पंचनामे करताना प्रशासनानं थट्टा चालवलीय की काय असा प्रश्न विचारला जातोय. शेतकऱ्याच्या नुकसानीचा पंचनामा करायला आलेले अधिकारी उस्मानाबादमध्ये शेतकऱ्यांचा आरोपी प्रमाणे फोटो काढत असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे.

Updated: Feb 19, 2018, 02:31 PM IST
सरकारने शेतकऱ्यांच्या हाती दिली आरोपींसारखी पाटी title=

उस्मानाबाद : अवकाळी पावसानं नुकासन झालेल्या शेतकऱ्यांच्या शेताचे पंचनामे करताना प्रशासनानं थट्टा चालवलीय की काय असा प्रश्न विचारला जातोय. शेतकऱ्याच्या नुकसानीचा पंचनामा करायला आलेले अधिकारी उस्मानाबादमध्ये शेतकऱ्यांचा आरोपी प्रमाणे फोटो काढत असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे.

अनेक शेतकऱ्यांचे असे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. उमरगा तालुक्यातल्या एकोंडी जहागीरी शिवारतील पिकांच्या पंचनाम्याच्या वेळचा एका फोटो झी 24 तासच्या हाती लागला आहे. शेतकऱ्यांना प्रशासनकडून मिळालेल्या अपमानास्पद वागणूकीबद्दल तीव्र संताप व्यक्त होतोय.

असेच प्रकार उस्मानाबादमधील मुरुम, चिंचोली, एकोंडी परिसरात झाल्याचे आतासमोर येत आहे.