कल्याणमध्ये थम्सअपमध्ये कपडा सापडला

वडापावमध्ये पाल, माझामध्ये किडे आढळल्यानंतर आता कल्याणमध्ये थम्सअपमध्ये कपडा सापडला 

Updated: Aug 31, 2018, 11:16 PM IST
कल्याणमध्ये थम्सअपमध्ये कपडा सापडला title=

ठाणे : वडापावमध्ये पाल, माझामध्ये किडे आढळल्यानंतर आता कल्याणमध्ये थम्सअपमध्ये कपडा सापडला आहे. कल्याणजवळच्या म्हारळ गावात हा प्रकार समोर आला आहे. म्हारळ गावातील एका दुकानातून विशाल घरत यांनी थम्स अप हे शीतपेय विकत घेतलं. मात्र ते फोडण्यापूर्वी त्यात त्यांना कपडा तरंगताना दिसला.

 दुकानदाराला याबाबत विचारणा केली असता कंपनीतून अशीच बाटली आली असून ती अद्याप सीलबंद असल्यानं आमची चूक नसल्याचं स्पष्टीकरण दुकानदाराने दिलं. मात्र यामुळे ग्राहकांच्या जीवाशी खेळ होत असल्याचा आरोप ग्राहक विशाल घरत यांनी केला असून संबंधितांवर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे.