ठाकरे की शिंदे? संजय शिरसाठ कोणाच्या संपर्कात? पहिल्यांदाच केला मोठा खुलासा!

Maharastra Politics : शिंदे गटातील आमदार संजय शिरसाठ हे आमच्या संपर्कात आहेत, असा खळबळजनक दावा ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी केला होता. त्यावर आता संजय शिरसाठ यांनी प्रत्युत्तर दिलंय,

Updated: Nov 3, 2022, 07:26 PM IST
ठाकरे की शिंदे? संजय शिरसाठ कोणाच्या संपर्कात? पहिल्यांदाच केला मोठा खुलासा! title=
Sanjay Shirsath,Eknath Shinde,Uddhav Thackeray

Sanjay Shirsath : आगामी मंत्रीमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटातील आमदार नाराज असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. तर दुसरीकडे शिंदे गटातील आमदार संजय शिरसाठ हे आमच्या संपर्कात आहेत, असा खळबळजनक दावा ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी केला आहे. शिंदे गटात जाऊन त्यांना पश्चाताप झाल्यातं देखील अंधारे यांनी म्हटलं आहे. त्यावर संजय शिरसाठ (Sanjay Shirsath) यांनी मोठा खुलासा केला आहे.

संजय शिरसाठ कोणाच्या संपर्कात ?

सुषमा अंधारे (Sushma Andhare) सध्या महाराष्ट्रात फायरबँड नेत्या म्हणून जात आहेत. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी वेगळं स्टेटमेंट देणं हे त्यांना गरजेचं आहे. मी नाराज वेगैरे नाही. माझा नाराजीचा काही संबंध नाहीये. आमचं चांगल्या पद्धतीने चालू आहे. शुषमा ताईंना माझ्याबद्दल काळजी वाटत असेल तर त्याचं स्वागत आहे, असंही शिरसाठ म्हणाले आहेत.

मी अजूनही एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याच संपर्कात आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना फोन आता तर निश्चित मी त्यांचा फोन घेईल पण ते फोन करणार नाहीत, याची मला खात्री आहे. मी नेता शिंदे यांचाच आहे, असंही संजय शिरसाठ झी 24 तासशी बोलताना म्हणाले आहेत.

आणखी वाचा - सत्तेचा फेरा, तरीही ईडीचा ससेमीरा, प्रताप सरनाईक यांची प्रॉपर्टी ED जप्त करणार

दरम्यान, मंत्रीपद कोणाला देयचं याचा निर्णय एकनाथ शिंदे घेतील, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे. सुषमा अंधारे जळगाव दौऱ्यावर असताना त्यांनी हे वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता शिरसाठ यांनी स्पष्टीकरण दिलंय.