राज्यात मार्चमध्ये मंदिरांच्या देणग्यांत दुप्पट वाढ, साईबाबाचरणी सहापट दान

temple donations doubled in March In Maharashtra​ : राज्यात मार्चमध्ये मंदिरांच्या देणग्यांत दुप्पट वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. 

Updated: Apr 26, 2022, 11:13 AM IST
राज्यात मार्चमध्ये मंदिरांच्या देणग्यांत दुप्पट वाढ, साईबाबाचरणी सहापट दान  title=

मुंबई : temple donations doubled in March In Maharashtra : राज्यात मार्चमध्ये मंदिरांच्या देणग्यांत दुप्पट वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. शिर्डीच्या साईबाबाचरणी इतर देवस्थानांपेक्षा सहापट दान जमा झाले आहे. शिर्डीच्या साईचरणी मार्चमध्ये 40 कोटी रुपयांचे दान जमा झाले. राज्यातल्या 4 प्रमुख देवस्थानांमध्ये कोट्यवधींचे दान जमा झाले आहे.

कोरोनानंतर मंदिरे खुली होताच भाविकांनी देवाचरणी सढळ हस्ते दान केले आहे. फेब्रुवारीच्या तुलनेत मार्चमध्ये अधिक दान केलंय. राज्यातल्या चार प्रमुख मंदिरांत कोट्यवधींचं दान आले आहे. सर्व देवस्थानांच्या एकूण रकमेच्या सहापट अधिक दान शिर्डीच्या साईचरणी आले. तर इतर देवस्थानांमध्येही मार्चमध्ये दान वाढले आहे. अंबाबाई आणि शेगावच्या गजानन महाराजांच्या दर्शनालाही मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले. पण तुळजापूर आणि पंढरपूर देवस्थानांच्या देणगी आणि भाविकांच्या संख्येत थोडी घट झाली आहे. 

भाविकांची संख्येत वाढ झाली आहे. शिर्डीत 10,06,254 भाविकांनी दर्शन घेतले आहे. पंढरपुरात मात्र घट झाली आहे. शिर्डीत फेब्रुवारी 2021मध्ये 5,86,977, मार्च 202 मध्ये 251,517 भाविक आले. तर दोन महिन्यांत लक्षणीय वाढ देवस्थान फेब्रुवारी 2022 मार्च 2022 शिर्डी 21 कोटी 40 कोटी तुळजापूर 4.29 कोटी 99,080 3.41 कोटी 45,161 पंढरपूर 1.70 कोटी 39,882 2.67 कोटी 82,885 सप्तशृंगी 85 लाख 20,576 1.41 कोटी 12,938 इकती रुपये वाढ दिसून येत आहे. 

- सप्तशृंगी देवस्थान येथे यंदा मार्चमध्ये 1 कोटी 41 लाखांचे दान झालेय.फेब्रुवारी 2022 मध्ये नगदी 79,31,341रुपये, सोने 105 ग्रॅम 225 मिली, चांदी १.२३७ किलो असे ८५,२०,५७६ रुपयांचे दान आले. मार्च 2022 मध्ये नगदी 1,26,10,982, सोने २८८ ग्रॅम ३७० मिली व चांदी २०.८०७ किलो मिळून 14112938  चे दान मिळाले. महिनाभरात दीडपट दान जमा झाले. मार्च २०२१ मध्ये नगदी 98,63,490, सोने 500 ग्रॅम तर चांदी 22 किलो मिळून 1,21,73,490 रुपये जमले होते.

- श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान
फेब्रुवारीत 1,70,39,882 रुपये, मार्चमध्ये 2,67,82,885 रुपये दान.तुलनेत मार्चमध्ये 97,43,003 रुपयांची देणगी वाढली.

- तुळजापूर देवस्थान
फेब्रुवारीत 4,29,99,080 रुपये, मार्चमध्ये 3,41,45,161 रुपयांची देणगी मिळाली. तुलनेत मार्चमध्ये 88,13,919 रुपयांची देणगी घटली.

- राम मंदिरासाठी दुप्पट देणग्या
उत्तर प्रदेशातील रामाचे जन्मस्थान असलेल्या अयोध्या येथील प्रस्तावित राम मंदिरासाठी विविध संघटनांनी देश-विदेशातून देणगी जमा केली. या अभियानातून 1100 कोटी अपेक्षित असताना 2100कोटी रुपये जमा झाले.