नाशिक : नाशिक जिल्हा रुग्णालयातील स्वाईन फ्लू विभागातील इंफ्ल्यूएन्जा लसीचा साठा संपलाय. एप्रिल महिन्यापासून जिल्हा रुग्णालयात साठा आलेला नाही.
स्वाईन फ्लूने बाधित रुग्ण आणि वॉर्डात काम करणाऱ्या परिचारिकांना स्वाईन फ्लूची बाधा होऊ नये म्हणून लस देणे आवश्यक असतानाही लस उपलब्ध नाही.
यावर्षी नाशिक जिल्ह्यात स्वाईन फ्लूने सर्वाधिक ४७ मृत्यू झालेत तरीही आरोग्य विभाग सुस्त आहे. महाराष्ट्रात स्वाईन फ्लूच्या रूग्णांमध्ये वेगाने वाढ होत असताना दिसत आहे.
स्वाईन फ्लूची साथ यापूर्वी मोठ्या शहरात दिसत होती, पण आता लहान शहरांमध्येही स्वाईन फ्लूने कहर केला आहे. ठाण्यातही स्वाईन फ्लूचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते.