पुण्यात आगीच्या २ घटना, सुदैवाने जिवीत हानी नाही

दोन सिलेंडरचा स्फोट झाल्यानं ही आग लागली होती.. सुदैवानं यात कोणतिही जीवित हानी झाली नाही.

Updated: Aug 19, 2017, 04:13 PM IST
पुण्यात आगीच्या २ घटना, सुदैवाने जिवीत हानी नाही title=

पुणे : पुणे शहरात आगीच्या दोन घटना घडल्या आहेत. शुक्रवारी खडकी येथील पडाळे वस्तीमध्ये रात्री उशिरा आग लागल्याची घटना घडली. दोन सिलेंडरचा स्फोट झाल्यानं ही आग लागली होती.. सुदैवानं यात कोणतिही जीवित हानी झाली नाही. मात्र या आगीनं १० ते १२ घरांचं मोठं नुकसान झालं.

अग्निशमन दलाच्या ५ गाड्या आणि २ टँकर्सच्या मदतीने या आगीवर तातडीने नियंत्रण मिळवण्यात आलं. तर दुसरीकडे शनिवारी पहाटे कॅम्प परिसरातील क्वालिटी रेस्टॉरंटमध्येही अचानक आग लागली.  अग्निशमन दलाच्या ६ बंबांच्या मदतीनंही आग विझवण्यात आली. सुदैवानं याही  दुर्घटनेत कोणतीही जीवीत हानी झाली नाही.