बाळासाहेबांच्या एका आवाजावर मुंबईतील नोकरी सोडणाऱ्या सूर्यकांत दळवींनी ठाकरेंची साथ का सोडली? वाचा सविस्तर पत्र

Suryakant Dalvi Joins BJP: बाळासाहेब ठाकरेंचे (Balasaheb Thackeray) निष्ठावंत आणि कडवे शिवसैनिक अशी ओळख असणारे सूर्यकांत दळवी (Suryakant Dalvi) यांनी भाजपात (BJP) प्रवेश करत उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) धक्का दिला आहे. दरम्यान त्यांनी पत्र लिहून यामागील कारणांचा खुलासा केला आहे.   

शिवराज यादव | Updated: Feb 1, 2024, 05:06 PM IST
बाळासाहेबांच्या एका आवाजावर मुंबईतील नोकरी सोडणाऱ्या सूर्यकांत दळवींनी ठाकरेंची साथ का सोडली? वाचा सविस्तर पत्र title=

Suryakant Dalvi Joins BJP: बाळासाहेब ठाकरेंचे (Balasaheb Thackeray) निष्ठावंत आणि कडवे शिवसैनिक अशी ओळख असणारे सूर्यकांत दळवी (Suryakant Dalvi) यांनी भाजपात (BJP) प्रवेश करत उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) धक्का दिला आहे. मुंबईत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. पक्षप्रवेशादरम्यान त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीकाही केली. दरम्यान पत्र लिहून त्यांन पक्ष सोडण्यामागील कारणांचा खुलासा केला आहे. 

सूर्यकांत दळवी यांनी लिहिलेलं पत्र जसंच्या तसं - 

आज मी माझ्या आयुष्यातील एक राजकीय कठोर निर्णय घेत असून माझ्यावान होत असलेल्या गलिच्छ राजकारणामुळे नाईलाजाने मला तो यावा लागत आहे. मी आमदार म्हणून दापोलीस संघात आपणा सर्वाच्या आशीर्वाद व साथीने केलेल्या २५ वर्षाच्या कार्याचा आढावा व लेखातीला जाण्या समीर मांदत आहे.

मा. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १९८५ मध्ये कोकणातील शिवसैनिकांनी आपल्या गावाकडे चला अशी हिंदुत्वाच्या विचारांची हाक दिल्यावर आम्ही मा. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित झालेल्या अनेक जुन्या सहकारी शिवसैनिकांनी दापोलीचे शिवसैनिक एकसंध करून एक प्रदीर्ष चळवळ उभी केली व दापोली मतदारसंघामध्ये शिवसेना व स्वगीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांच वादळ निर्माण केले. कोणताही नंदनाव न ठेवता समाजातील सर्वसामान्य व्यतीपर्वत व पराघरात शिवसेना व शिवसेनेचे विचार पोहचविण्याचे काम केले व हे करीत असताना जातपात न मानता मतदार संघातील सर्व समाजघटकांना सोबत घेऊन दापोली मतदार संघ शिवनामय केला. शिवसेनाप्रमुखांचे पवित्र हिंदुत्वाचे विचार दापोली तालुक्यातील दुर्गम भागात पोहर्यावण्याचे अवघड काम आम्ही केले.

१९९० सालामध्ये महाराष्ट्रात विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका घोषित झाल्यावर स्वीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दापोली मतदारसंघाचे शिवसेनेचे तिकीट मला घोषित करून त्यांनी प्रथमव प्रचाराचे रणशिंग स्वतः दापोलीत येऊन फुंकले व मला माझ्या प्राप्रिय दापोलीच्या जनतेने मरीम मतांनी निवडून दिले. हे सारे श्रेय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे व निष्ठावंत शिवसैनिक यांचेकडे जाते. हे माझ्या आयुष्यातील मोठे भाग्य आहे. तद्नंतर सलग २५ वर्ष दापोलीच्या राजकीय पटलावर मी कधीच मागे वळून पाहिले नाही. २५ वर्षाच्या काळात दापोलीच्या सुसंस्कृत मतदारसंघातील जनतेची सेवा करण्याचे अविरल भाग्य मला मिळाले. शिवसेना व हिंदुत्व है ज्वलंत विचार दापोलीच्या तरुण पिढीच्या हृदयात समर्पित करण्याचे पवित्र कार्य माझ्या हातून पडले, यासाठी मी मा. शिवसेनाप्रमुखांचा शतशः ऋणी आहे.

दापोलीसारख्या पवित्र मतदार संघात कार्य करीत असताना शिवसेनेवर आलेल्या अनेक संकटावर आम्ही मात करून दापोलीची शिवसेना आजपर्यंत अवाधित ठेवली आहे. पार्थ सारे श्रेय दापोलीच्या निष्ठावंत शिवसैनिकांना जाते.

२०१४ मध्ये दापोली मतदारसंघामध्ये स्वकीयांनी केलेल्या विश्वासयानामुळे निवडणुकीत माझा प्र५मच कालांतराने उघड झाले, पराभवानंतरमुद्धा संपूर्ण मतदारसंघात लक्ष घालून, जनसामान्य मतदारांचे प्रश्न सोडवित, जनतेचे आभार मानून व पुन्हा सक्रिय होऊन शिवसैनिकांमध्ये चैतन्य निर्माण केले. परंतु दापोली मतदारसंघात फुटीची बीजे पेरून काही विघ्नसंतोषी लोकांनी संघटनेची घडी विस्कळीत करण्याचा प्रयत्न केला.

दापोली नगरपंचायत शिवपुतळा उ‌द्घाटन सोहळयावेळी ते स्पष्ट झाले. आपल्या राजकीय स्वार्थासाठी मतदारसंघातील ठराविक लोकांना हाताशी धरून शिवसेना फुटीची बीजे पेरली आणि त्याचीच परिणीती शिवसेना फुटण्यामध्ये झाली. याबाबत वेळोवेळी वरिष्ठ नेतृत्वाला सावध करण्याचा प्रयत्न माझ्याकडून व माझे सहकारी यांच्याकडून झाला. परंतु त्याकडे वेळीच लक्ष दिले गेले नाही. तरीही दापोलीची शिवसेना अखंड ठेवण्याचे काम आम्ही सर्व शिवसैनिकांनी केले.

सध्या आपल्याच पक्षातील काही नेते त्यांची राजकीय महत्वकांक्षा पूर्ण करण्यासाठी मतदारसंघात जातीयवादाचे गलिच्छ राजकारण करून 'मी म्हणजेच शिवसेना' अशा पद्धतीने पक्षप्रमुख यांना अंधारात ठेवून आपला कार्यभाग साधण्याचे कार्य करीत आहेत. मी अनेक वेळा कार्यकर्ते व विभागीय नेत्यांना घेऊन सन्माननीय पक्षप्रमुख मा. उद्धवसाहेब ठाकरे यांच्यापर्यंत पक्षविरोधी काम पोहचविण्याचा प्रयत्न केला. तरीसुद्धा पक्षप्रमुखांनी कोणतीही कार्यवाही केली नाही.

दापोली मतदारसंघ शिवसैनिकांना सोबत घेऊन एकसंघ ठेवण्याचे कार्य करीत आलो आहे. ज्यांना पक्षाने वेळोवेळी झुकते माप दिले, त्यांनीच दापोलीचे पर्यावरण बिघडविण्याचे काम सातत्याने केले. त्यांना वेळोवेळी रोखण्याचे काम माझ्यासह सर्व शिवसैनिकांनी केले होते. परंतु सध्या संघटनेमध्ये जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना जातीयवादाचे विष पसरवून सतत डावलण्याचे काम केले जात आहे. संघटनेमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे. उदाहरणार्थ मा. शिवसेना नेते श्री. आदित्यजी ठाकरे यांचा खेड येथील खळा बैठकीचा कार्यक्रम, आत्तापर्यंत संघटनेमध्ये काम करीत असताना सर्वाना विश्वासात घेऊन निर्णय घेतले जात होते, परंतु हल्ली उमेदवार निवडीसारखा निर्णय घेतानासुद्धा जुन्या निष्ठावंत पदाधिकारी यांना डावलले जात आहे हे मनाला निश्चितव क्लेश देणार आहे. कोकणामध्ये ३० वर्षापूर्वी मुंबईकरांना संघटीत करून शिवसेना ग्रामीण गागात वाढविण्याचे काम केले. शिवसेना मुंबई व ग्रामीण कार्यकारीणी यांच्या समन्वयातून दापोली मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला झाला. सध्या मुंबई व ग्रामीण कार्यकारणी समन्वयाने काम करीत असताना सुद्धा त्यांच्यात जातीयवाद निर्माण करून फूट पाडण्याचे काम सध्या सुरु आहे. मुंबई व ग्रामीण भागात होणाऱ्या संघटनात्मक कार्यक्रमांचे मला व माझ्या कार्यकर्त्यांना निमंत्रण न देणे, कार्यकत्यांमध्ये गटबाजी करून त्यांचे वस्तीकरण करणे व आपला राजकीय स्वार्थ साधणे अशा प्रकारचे पक्षसंघटना वाढीसाठी बाधा आणणारे काम काहीजण करीत आहेत.

वास्तविक पक्ष फुटीनंतर सर्व जुन्या व नवीन कार्यकत्यांना घेऊन पुन्हा नव्या जोमाने संघटना बांधणीसाठी, माझ्या आत्तापर्यतच्या अनुभवाचा व संघटन कौशल्याचा उपयोग करून घेऊन संघटना बाढीसाठी बळ देणे अपेक्षित असताना, माझ्या निष्टेबाबत सतत वावड्या उठवून मला महत्वाच्या निर्णयप्रक्रियेमधून बाजूला करण्याचे काम सुरु आहे. पक्षसंघटनेत अनेकांना, मंत्रीपदे, नेते, उपनेते, संपर्कप्रमुम्न अशी पदे दिली गेली. त्यातीलही काही नेते पक्ष सोडून गेले. परंतु पक्षात निष्ठावंत असणाचा नेतृत्वाची सतत उपेक्षा करण्यात आली.

सबब, या सर्व कृत्यात कंटाळून मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांना साथ देणारा पक्ष म्हणून मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात काम करण्याचा निर्णय घ्यावा लागतोय.

माझ्या पंचवीस वर्षाच्या कार्यकाळात दापोली मतदार संघातील अनेक महत्वाची कामे मार्गी लावण्यात मी यशस्वी झालो, असे असले तरी काळानुसार मतदार संघातील नागरिक यांच्या नवीन गरजा निर्माण होत असताना दापोली मतदारसंघातील सुशिक्षित बेरोजगार, महिला यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, पर्यटन वाढीसाठी नवीन प्रकल्प आणणे, हर्णे, दाभोळ जेटीचा प्रश्न मार्गी लावणे, सागरी महामार्गाचे काम पूर्ण करणे, यासारखे धोरणात्मक अनेक विकास प्रकल्प मार्गी लागणे आवश्यक आहे. आणि अशी विकासकामे पूर्ण ज्ञायची असतील तर केंद्र व राज्य सरकारच्या समन्वय असल्याशिवाय शक्य नाही. गेल्या दहा वर्षात देशभरात होत असलेल्या विकासात्मक कामातून मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांनी दाखवून दिले आहे. आपल्या दापोली मतदार संघाचा विकास केवळ राजकारणामुळे खंडीत झाला आहे. त्याला चालना मिळायची असेल तर केवळ विरोधाला विरोध न करता मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी व उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरु असलेल्या विकासात्मक योजनांचा प्रभावीपणे वापर करून मतदार संघाचा विकास करता येणे शक्य आहे असे मला वाटते.

दापोली मतदार संघातील विकासासाठी व येणाऱ्या काळात आपल्या सर्व सहकार्याना सामाजिक, राजकीय कामात बळ देण्यासाठी मी माझ्या सर्व निष्ठावंत शिवसैनिक यांना माझी भूमिका स्पष्ट करून त्यांचे आशीर्वाद व साथ घेऊन भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश करीत आहे.

आपली साथ आणि आशीर्वाद सदैव सोबत राहो हीच विनंती

आपलाच,

श्री. सूर्यकांत शिवराम दळवी