Supriya Sule On Ajit Pawar: विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी हिवाळी अधिवेशनात स्पष्टीकरण देत असताना छत्रपती संभाजी महाराज यांचा उल्लेख स्वराज्यरक्षक असा केला. त्यावेळी त्यांनी धर्मवीर या नावावर देखील आक्षेप घेतला. त्यानंतर मोठा वाद निर्माण झाल्याचं पहायला मिळतंय. अजित पवार आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या वक्तव्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. (Supriya Sule Says I Feel Like Ajit Pawar Is Chief Minister of Maharastra marathi news)
सुप्रिया सुळे या पुण्यात (Pune News) एका कार्यक्रमासाठी आल्या होत्या. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधला. बेळगाव प्रश्नावर अमित शाह (Amit Shah) यांच्यासोबत महाविकास आघाडीतील खासदाराची बैठक घेतली. त्यामुळे त्यांनी अमित शहा यांचे आभार देखील मानले आहेत.दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना बोलवून चर्चा केली. याप्रकरणी कोणी काही बोलणार नाही, असं अमित शहा यांनी सांगितलं. तरी देखील कर्नाटकचे मुख्यमंत्री (Basavaraj Bommai) वक्तव्य करत आहेत, असं सुळे म्हणाल्या.
बोलत असताना सुप्रिया सुळे यांनी राज्याच्या राजकारणावर (Maharastra Politics) देखील भाष्य केलं. अनेकदा मला अजितदादा मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतं, असं सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या आहेत. राजकारणातील गलिच्छ आरोप-प्रत्यारोप थांबवा. मी माझ्या पक्षापासून सुरूवात करते, अस म्हणत सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी सर्वपक्षांना आवाहन केलं आहे.
दरम्यान, देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) पुढाकार घेऊन गलिच्छ राजकारण थांबवावं, असही सुळे म्हणाल्या आहेत. प्रत्येकाच्या घरात मुली आहे, असंही त्या म्हणाल्यात. सुप्रिया सुळे यांचं अजित पवार यांच्यावर (Supriya Sule On Ajit Pawar) केलेल्या वक्तव्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. त्यामुळे सुप्रिया सुळे यांना नेमकं काय म्हणायचंय?, असा सवाल आता उपस्थित होताना दिसतोय.