Nagpur News : महिला कर्मचाऱ्यांकडे टकमक पाहणाऱ्यांनो सावधान! आता तुमची खैर नाही...

Nagpur News : काही दिवसांपूर्वी आयटम म्हटल्याने एका व्यावसायिकाला तब्बल दीड वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. त्यानंतर आता महिला कर्मचाऱ्यांकडे एकटक पाहणाऱ्यांवरही कारवाई होणार आहे.

Updated: Jan 7, 2023, 06:05 PM IST
Nagpur News : महिला कर्मचाऱ्यांकडे टकमक पाहणाऱ्यांनो सावधान! आता तुमची खैर नाही... title=

Nagpur News : मुंबई एका  मुलीला आयटम (Item) म्हणणे काही महिन्यांपूर्वी एका तरुणाला चांगलेच महागात पडले होते. 16 वर्षीय मुलीला आयटम म्हटल्याने 25 वर्षीय व्यावसायिकाला कोर्टाने दीड वर्षांची शिक्षा सुनावली. आयटम हा शब्द मुलीचा लैंगिक छळ (sexual infidelity) करण्यासाठीच वापरला असल्याचे निरीक्षण कोर्टाने नोंदवत आरोपीला शिक्षा सुनावली होती. त्यानंतर आता महिलांकडे एकटक पाहणंही महागात पडण्याची शक्यता आहे. सहकारी महिला कर्मचाऱ्याकडे टक लावून पाहिलं तर एखाद्याला नोकरी गमावावी लागण्याची शक्यता आहे.

नागपूर महापालिकेत (Nagpur Municipal Corporation) सहकारी महिला कर्मचाऱ्यांकडे टक लावून पाहिलं तर त्या कर्मचाऱ्याला त्याची नोकरी गमवावी लागणार आहे. महिला कर्मचाऱ्यांकडे एकटक पाहणाऱ्यांवर महापालिकेकडून निलंबनाची कारवाई होणार आहे. कार्यालयांमध्ये महिलांचा लैंगिक छळ रोखण्यासाठी महापालिकेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

नागपूर महानगरपालिकेत महिला तक्रार निवारण समिती (Internal Complaint Committee for Prevention of Sexual Harassment) स्थापन करण्यात आली आहे. समितीच्या अध्यक्षपदी डॉ. भावना सोनकुसळे यांची नियुक्ती करण्यात आली असून, सचिवपदी अलका गांवडे आहेत. तर महानगर पालिकेच्या सर्वच  कार्यालयांत, तसेच विभागात यासंदर्भात सूचना देण्यासाठी माहिती फलक लावण्यात येणार आहे. 

शनिवारी, नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी., अतिरिक्त आयुक्त डॉ. राम जोशी, उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले, समितीच्या नवनियुक्त अध्यक्षा डॉ. भावना सोनकुसळे, सदस्य सचिव अलका गांवडे यांच्या उपस्थितीत महापालिकेच्या मुख्य इमारतीत मनपा महिला तक्रार निवारण समिती फलकाचे अनावरण करण्यात आले. महानगरपालिकेच्या सर्व विभागीय कार्यालयांमध्ये या समितीबाबत माहिती देण्यात यावी अशा सूचना पालिका आयुक्त राधाकृष्णन बी यांनी दिल्या आहेत.

दरम्यान, महिला तक्रार निवारण समितीकडे यासंदर्भात तक्रार आली तर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच तक्रार घेऊन येणाऱ्या पीडितांच्या संरक्षणाची आणि गुप्ततेची काळजी घेतली जाणार आहे. चौकशीनंतर आरोपी व्यक्ती दोषी आढळल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. तसेच निलंबनाचीही कारवाई केली जाऊ शकते.