Supriya Sule: 'दादूस' अजितदादांच्या बंडानंतर सुप्रिया सुळेंनी एका शब्दात संपवला विषय; पाहा Video

Supriya Sule On Ajit pawar revolt: अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे (Supriya Sule) शांत असल्याचं दिसत होतं. अशातच आता सर्व प्रकरण थंड होत असताना सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत आपली भूमिका मांडली.

Updated: Jul 2, 2023, 08:25 PM IST
Supriya Sule: 'दादूस' अजितदादांच्या बंडानंतर सुप्रिया सुळेंनी एका शब्दात संपवला विषय; पाहा Video title=
Supriya Sule On Ajit Pawar

Supriya Sule On Ajit Pawar: महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharastra Politics) आज मोठा भूकंप झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज शरद पवार (Sharad Pawar) यांच्या भूमिकेच्या विरोधात जाऊन उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्या बंडामुळे एकच खळबळ उडाली. अजित पवार (Ajit Pawar) यांनी गेल्या साडे तीन वर्षात तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याने आता राष्ट्रवादीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसत आहेत. अशातच आता शरद पवार यांनी अजित पवार आणि 9 आमदारांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. राज्यात खळबळ उडाली असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे (Supriya Sule) शांत असल्याचं दिसत होतं. अशातच आता सर्व प्रकरण थंड होत असताना सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत आपली भूमिका मांडली आहे.

अजितदादांच्या बंडानंतर सुप्रिया सुळे यांननी शरद पवारांचा 13 सेकंदाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा आश्वासक चेहरा कोण? या प्रश्नावर स्वत: शरद पवारांनी (Sharad Pawar) उत्तर दिसत आहेत. झी 24 तासच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या या प्रश्नावर शरद पवारांनी हास्यमय मुद्रेत 'शरद पवार' असं नाव घेतलं. राष्ट्रवादीच्या लाखो कार्यकर्त्यांसाठी हे मोठं दिलासादायक उत्तर होतं. तोच व्हिडिओ सुप्रिया सुळे यांनी ट्विट केला आहे. त्यावर सुप्रिया सुळे यांनी एका शब्दात कॅप्शन दिलंय.

पाहा ट्विट 

सुप्रिया सुळे यांच्या ट्विटच्या व्हिडिओला 'प्रेरणास्थान' (Inspiration) असं कॅप्शन दिलं. अजितदादांच्या बंडानंतर सुप्रिया सुळेंनी एका शब्दात आपली भावना मांडली मांडली. अजित पवार यांना अर्थमंत्रीपदाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. पुण्याच्या पालकमंत्रीपदाची धुरा देखील दिली जाऊ शकते. 

आणखी वाचा - 'राष्ट्रवादी पक्ष फुटला नाही, पण अजित पवारांवर कारवाई होणार'; शरद पवारांची स्पष्ट केली भूमिका!

दरम्यान, अजित पवार यांच्यासह छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा अत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे आणि अनिल पाटील या 9 जणांनी शपथ घेतली. अजित पवार यांच्या बंडानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी रोहित पवार त्यांच्यासह दिसले.