नोएडा येथील ट्विन टॉवर्सनंतर नवी मुंबईतील 'या' दोन इमारती होणार जमीनदोस्त?

Navi Mumbai News: सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे या दोन इमारतीत राहणाऱ्या सुमारे 160 हून अधिक कुटुंबांवर बेघर होण्याची नामुष्की ओढवली आहे.

Updated: Nov 27, 2022, 05:41 PM IST
नोएडा येथील ट्विन टॉवर्सनंतर नवी मुंबईतील 'या' दोन इमारती होणार जमीनदोस्त? title=
twin towers navi mumbai

स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई: काही महिन्यांपुर्वी दिल्लीच्या नोएडा (noida) येथील ट्विन टॉवर्स जमीनदोस्त करण्यात आले. त्यानंतर आता नवी मुंबईतील ट्वीन टॉवर जमीनदोस्त करण्याचे सर्वाच्च न्यायालयानं (supreme court) आदेश जाहीर केले आहेत. नेरूळ (nerul) येथील सार्वजनिक उद्यानांच्या भूखंडावर बेकायदेशीर उभ्या असलेल्या कृष्णा कॉम्फ्लेक्स आणि त्रिमुर्ती दोन इमारती (twin towers) जमीनदोस्त करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे नोएडा येथील अनधिकृत ट्वीन टॉवर(twin towers in navi mumbai) जमीनदोस्त करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची पुनरावृत्ती आता नवी मुंबईत होण्याची शक्यता आहे. (Supreme Court order to demolish unauthorized twin towers in Navi Mumbai)
 
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे या दोन इमारतीत राहणाऱ्या सुमारे 160 हून अधिक कुटुंबांवर बेघर होण्याची नामुष्की ओढवली आहे. नेरुळ येथील हे उद्यानासाठी राखीव असलेले भूखंड सिडकोने (Cidco) महापालिकेला (Municipality) हस्तांतरित केले होते. मात्र ज्यावेळेस या भूखंडांचा ताबा घेण्यासाठी महापालिका अधिकाऱ्यांनी सर्व्हेक्षण केले तेव्हा उद्यानाच्या दोन भूखंडांपैकी एका भूखंडावर कृष्णा कॉम्फ्लेक्स ही तळ मजला अधिक पाच मजले आणि दुसऱ्या भूखंडावरील त्रिमुर्ती पार्क ही तळमजला अधिक सहा मजली इमारत अनधिकृतरित्या उभी करण्यात आल्याचे आढळून आले आहे.  

हेही वाचा - पत्नीकडे पाहू नको बोलल्याचा राग मनात धरत तो थेट घरात शिरला अन्... थराराक घटना

नक्की काय आहे प्रकरण 

टॉवर उभे राहताना तसेच तेथे नागरिक राहायला येईपर्यत महापालिकेने कोणतीच कारवाई केली नाही मात्र आता न्यायालयाच्या निर्णयाने 160 कुटूंब (families) रस्त्यावर येण्याची शक्यता उद्भवली आहे. त्यांच्या बाबतीत सहानभूतीने विचार करण्याची मागणी या कुटूंबांकडून केली जात आहे. कोर्टाच्या निर्णयामुळे बेघर होणारे कुटुंब आता राष्ट्रपतींकडे धाव घेणार असून सहा दिवसात सर्वोच्च न्यायालयात स्वतः घर खाली करण्याबाबत लिहून द्यावे लागणार आहे. 160 कुटुंब ही रस्त्यावर आली तर याला जबाबदार असणारे जमीनमालक, बिल्डर आणि तत्कालीन पालिका आधी एकऱ्यावर कारवाई होणार का?, असा संतप्त प्रश्न बाधित कुटूंब करत  आहेत. 

नोएडानंतर आता नवी मुंबई ? 

नोएडा इथल्या ट्विन टॉवर्स जमीनोदोस्त झाल्यानंतर आता नवी मुंबईतील हे काही ट्विन टॉवर्स जमीनदोस्त होण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. येथे राहणारे रहिवासी हे व्यथित झाले असून सध्या यामुळे अनेक कुटुंब रस्त्यावर येण्याच्या मार्गावर आहेत की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तेव्हा लवकरच या प्रकरणी रहिवाशांना समाधान मिळे अशी आशा आहे. या प्रकरणी लोकांनी न्यायासाठी धाव घेतली असून या प्रकरणातून त्यांना लवकरच दिलासा मिळेल अशी आशा इथे राहणाऱ्या रहिवाश्यांना आहे.