राष्ट्रवादी काँग्रेसचे नेहमीच शांत दिसणारे खासदार सुनील तटकरे पत्रकार परिषदेत संतापलेले पाहायला मिळाले. यासाठी त्यांना विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाचं निमित्त ठरलं. अजित पवार घरवापसी करणार का? असा प्रश्न एका पत्रकारानं त्यांना विचारला. त्यानंतर संतापलेल्या सुनील तटकरेंनी आपली नाराजी व्यक्त केली. तसंच तुम्ही असा प्रश्न कसा विचारु शकता? असा सवालही पत्रकाराला केला. पत्रकार परिषदेची एका मर्यादा असते. पत्रकार आणि बोलणाऱ्या नेत्यांमध्ये एक योग्य संवाद असायला हवा असंही मत त्यांनी मांडलं.
अजित पवार घरवापसी करणार का? असा प्रश्न विचारण्यात आलं असता सुनील तटकरे म्हणाले की, "मी तुम्हाला विनंती करु इच्छितो की, पत्रकार परिषदेची एका मर्यादा असते. आमच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित करु नका. आम्ही निर्णय घेतला असून त्यानुसार वाटचाल करु. त्यामुळे तुम्ही असे प्रश्न विचारु नका. पत्रकार आणि बोलणाऱ्या नेत्यांमध्ये एक योग्य संवाद असायला हवा. तुम्ही असे प्रश्न विचारता कामा नये. तुम्हाला हे कसं काय वाटलं ते सांगा".
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, मुंबई कार्यालयातून पत्रकार परिषदेचे थेट प्रक्षेपण https://t.co/IBFRly5VMt
— Sunil Tatkare (@SunilTatkare) August 13, 2024
पुढे ते म्हणाले, "महायुती सरकारच्या माध्यमातून आम्ही लाडकी बहीण योजना आणली. सरकारमध्ये गेलो यामुळे भगिनींसाठी योजना आणल्याचं अजित पवारांनी सांगितलं आहे. शेतकऱ्यांना 14 हजार कोटींची कर्जमाफी दिली. मुलींसाठी मोफत शिक्षण योजना आणली. आम्ही पूर्ण विचाराने एनडीएत सामील होण्याचा विचार केला असून, पूर्ण ताकदीने विधानसभा निवडणूक लढणार आहोत. या 5 दिवसांच्या दौऱ्यात अजित पवारांना, राष्ट्रवादीला जो प्रतिसाद मिळाला त्यामुळेच विरोधकांच्या मनात पोटशूळ उठलं आहे, भीती निर्माण झाली आहे. पूर्णपणे जिकंणार हे स्वप्न विरोधकांचं बदललं आहे. त्याच्यामुळेच अशाच प्रकारचे निराधार आरोप केले जात आहेत. आम्ही स्वच्छ भूमिका घेऊन लोकांसमोर जात आहोत".
मी माझ्या बहिणीच्या (सुप्रिया सुळे) विरोधात सुनेत्राला (Sunetra Pawar) उभं करायला नको होतं. पण त्यावेळेस केलं गेलं. पार्लमेंट्री बोर्डाने तो निर्णय घेतला होता असं अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले आहेत. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत, अजित पवारांनी सुनेत्रा पवारांना सुप्रिया सुळेंविरोधात उमेदवारी देणं चूक होती अशी कबुली दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
अजित पवारांना लाडकी बहीण योजनेसंदर्भात प्रश्न विचारलं असता त्यांनी कबुली देत म्हटलं की, “सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी आहेत. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी असतं पण बहिणी सगळ्या लाडक्या आहेत. अनेक घरांमध्ये राजकारण चालतं. राजकारण हे पार घरात शिरु द्यायचं नसतं. मागे मात्र माझ्याकडून थोडी चूक झाली".
पुढे ते म्हणाले, "मी माझ्या बहिणीच्या (सुप्रिया सुळे) विरोधात सुनेत्राला उभं करायला नको होतं. पण त्यावेळेस केलं गेलं. पार्लमेंट्री बोर्डाने तो निर्णय घेतला होता. आता जे झालं ते एकदा बाण सुटल्यासारखं होतं. आज मला माझं मन सांगतं आहे की तसं व्हायला नको होतं”.