वाघ गुरगुरत असेल तर मीदेखील वनमंत्री आहे- सुधीर मुनगंटीवार

वाघाचे संवर्धन-संरक्षण करणे मलाही माहिती आहे.

Updated: Nov 2, 2019, 01:17 PM IST
वाघ गुरगुरत असेल तर मीदेखील वनमंत्री आहे- सुधीर मुनगंटीवार title=

चंद्रपूर: महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट करण्याच्या वक्तव्यावरून शिवसेनेने शनिवारी सुधीर मुनगंटीवार यांना चांगलेच फटकारले होते. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तील अग्रलेखातून त्यांचा चांगलाच समाचार घेण्यात आला होता. महाराष्ट्रात आपले सरकार आले नाही तर राष्ट्रपती राजवट लागू करु शकतो, असे भाजपला वाटते. राष्ट्रपती आपल्या खिशातच आहे, असे त्यांना वाटते की काय, असा जळजळीत सवालही 'सामना'तून विचारण्यात आला.

काश्मीरमध्ये भाजप आणि पीडीपीची विचारधारा समान होती का; संजय राऊतांचा सवाल

याविषयी आज सुधीर मुनगंटीवार यांना प्रसारमाध्यमांकडून विचारणा करण्यात आली. तेव्हा मुनगंटीवार यांनी म्हटले की, मला पत्रकारांकडून राज्यात सरकार स्थापन नाही झाले, तर काय होईल, असा प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा मी केवळ घटनेत राष्ट्रपती राजवटीची तरतूद आहे, अशी माहिती दिल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले. तसेच शिवसेनेच्या टीकेविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, वाघ अग्रलेख लिहून गुरगुरणार असेलतर मी वनमंत्री आहे. वाघाचे संवर्धन-संरक्षण करणे मलाही माहिती आहे. मी नेहमी शिवसेना भाजपची युती टिकण्यासाठीच प्रयत्न केले. त्यामुळे आता वाघ गुरगुरत असला तरी त्याला सोबत घ्यायचेच आहे, असे मुनगंटीवार यांनी सांगितले. 

भाजपला राष्ट्रपती म्हणजे काय खिशातला रबरी स्टॅम्प वाटतो का?- शिवसेना

दरम्यान, शनिवारी भाजपकडून शिवसेनेसोबतचा वाद मिटवण्याचे संकेत देण्यात आले. स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. देवेंद्र फडणवीस हे आज किंवा उद्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून किंवा त्यांना भेटून चर्चा करतील. शिवसेनेच्या गोटातूनही या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे.