Success Story: बस्तर हे नक्षलग्रस्त क्षेत्र म्हणून ओळखले जाते. पण बस्तरच्या भूमीतली एक प्रेरणादायी कथा समोर आली आहे. आपल्या मेहनतीमुळे बस्तरचा शेतकरी दरवर्षी 25 कोटींची उलाढाल करत आहे. डॉ.राजाराम त्रिपाठी असे या शेतकऱ्याचे नाव असून ते पूर्वी बँकेत साधी नोकरी करायचे.
राजाराम त्रिपाठी यांचे नाव बस्तरमध्ये काळी मिरी आणि पांढरी मुसळीचे सर्वात मोठे उत्पादक म्हणून घेतले जाते. राजाराम त्रिपाठी सुमारे 400 आदिवासीच्या सहकार्याने पांढरी मुसळी आणि काळी मिरीचे उत्पादन घेत आहेत. त्यांनी उत्पादित केलेला माल युरोप आणि अमेरिकन देशांमध्ये विकला जातो. कोंडागाव येथील रहिवासी असलेले राजाराम सेंद्रिय शेती करतात. राजाराम यांना भारत सरकारकडून तीन वेळा सर्वोत्कृष्ट शेतकरी पुरस्कार मिळाला आहे. राजाराम हे हेलिकॉप्टर विकत घेणार आहेत. त्याचा उपयोग ते शेतात औषध फवारणीसाठी केला जाईल.
राजाराम यांचे संपूर्ण कुटुंबही या व्यवसायाशी जोडले गेले आहे. राजाराम आता ७ कोटींचे हेलिकॉप्टर खरेदी करणार आहेत. यासंदर्भात राजाराम यांनी हॉलंडच्या रॉबिन्सन कंपनीशीही चर्चा केली आहे. हे हेलिकॉप्टर शेतीसाठी वापरण्यात येणार आहे.
राजाराम R-44 मॉडेलचे चार आसनी हेलिकॉप्टर खरेदी करण्याच्या तयारीत आहेत. माँ दंतेश्वरी हर्बल ग्रुपचे सीईओ राजाराम यांची वार्षिक उलाढाल 25 कोटी रुपये आहे. पूर्वी ते बँक ऑफ इंडियामध्ये प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) म्हणून काम करत होते. पण आता शेतीत घेतलेल्या मेहनतीत त्यांना मोठा नफा मिळाला आहे. त्यामुळे राजाराम यांची कहाणी आज लाखो तरुणांना प्रेरणा देत आहे.