पुणे : सिंहगड शैक्षणिक संस्थेच्या विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे आंदोलन
पुण्यातील सिंहगड शैक्षणिक संस्थेवर प्रशासकीय मंडळ नेमण्यात यावं,अशी शिफारस सरकारला करण्यात येणार आहे. पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापकीय परिषदेच्या बैठकीत हा निर्णय झालाय. त्याच बरोबर 6 मार्च पासून सुरू होणाऱ्या सिंहगड संस्थेतील अंतर्गत परीक्षाही पुढं ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मात्र विद्यार्थी आणि शिक्षकांचं आंदोलन सुरूच राहणार आहे. मागील 2महिने सुरू असलेले सिंहगड शिक्षण संस्थेच्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. शिक्षकांचे 16 महिने थकीत पगार द्यावेत, सिंहगड संस्थेवर प्रशासक नेमावा, घटक चाचण्या 15 दिवस पुढं ढकलण्यात याव्यात आणि संस्थापक मारुती नवले यांच्यावर फौजदारी कारवाई करावी. या प्रमुख मागण्या आहेत.