मुंबई: आतापर्यंत गाडी रिव्हर्समध्ये उलटी जाते असं ऐकलं असेल पण अख्खी गाडीच उलटी धावायला लागली तर? असा प्रश्न विचारल्यानंतर 2 सेकेंद तुम्हालाही प्रश्न पडला असेल हे कसं शक्य आहे. पण सोशल मीडियावर एक जबरदस्त व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर RTO ने या गाडीला रस्त्यावर धावायला कशी परवानगी दिली असेल असा प्रश्न मनात आल्याशिवाय रहात नाही.
एका चालकाने गाडी सरळ डिझाइन करण्याऐवजी उलटी डिझाइन केली आहे. त्यामुळे ही गाडी उलटी पळते. हे डिझाइन इतक विचित्र आहे की समोरून जर ही गाडी आली तर आपल्यालाही थोडा धक्का बसेल आणि समोरून येणारं वाहनही बावचळेल. इंटरनेटवर लोकांनी पेट्रोल-डिझेल-सीएनजी सारख्या गॅसवर चालणाऱ्या गाड्या पाहिल्या असतील. इतकच नाही तर आता इलेक्ट्रीक बाईक आणि कारही आल्या आहेत.
या गाड्यांचं डिझाइन खूप वेगवेगळे आणि सुंदर असं पाहायला मिळतं. मात्र ज्याची आपण कल्पनाही केली नसेल अशी गाडी तयार करण्यात आली आहे. सोशल मीडियावर या कारचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर युझर्सचं डोकंही चक्रावलं आहे. अशी कधी गाडी धावेल याची कल्पनाही कोणी केली नव्हती. ही गाडी उलटी धावते. तुम्ही जर हा व्हिडीओ पाहिला तर एक मिनिटं वाटेल की गाडी उलटी चालते आहे मात्र तसं नाहीय.
hepgul5 नावाच्या युझरने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 960 लाईक्स मिळाल्या आहेत. तर वेगवेगळ्या कमेंट्सही या व्हिडीओवर होत आहेत. दुसरीकडे या गाडीत बसायचं कसं असा प्रश्नही काही युझर्सना पडला आहे.