राज्य सहकारी बॅंक गैरव्यवहार : अजित पवारांसह शेकडो संचालकांवर गुन्हे

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी अखेर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Updated: Aug 26, 2019, 09:02 PM IST
राज्य सहकारी बॅंक गैरव्यवहार : अजित पवारांसह शेकडो संचालकांवर गुन्हे title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी अखेर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.  राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांची नावे यात आहेत. राज्य सरकारने मुंबईतील आर्थिक गुन्हे शाखेत हे गुन्हे दाखल केले आहेत. विशेष म्हणजे राज्य सहकारी बँकेतील संचालकांबरोबर जिल्हा बँकेतील संचालकांविरोधातही हे गुन्हे दाखल करण्यात आलेत. त्यामुळे गुन्हे दाखल झालेल्यांची संख्या शेकड्याच्यावर आहे.

उद्या सुनावणी 

गुन्हे दाखल झालेल्यांमध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, शेकापचे नेते जयंत पाटील, विजयसिंह मोहीते-पाटील, हसन मुश्रीफ, अमरसिंह पंडित, विजय वडेट्टीवार, शिवसेनेचे आनंदराव अडसुळ यांच्यासह राज्य सहकारी बँकेतील ७५ संचालकांचा समावेश असून जिल्हा बँकेतील संचालकांचाही समावेश आहे. यातील काही संचालकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं असून त्यावर उद्या सुनावणी आहे.