कोल्हापुरच्या मानाच्या गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात

कोल्हापुरात सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावर मानाच्या तुकाराम माळी तालीम मंडळाचा गणपती अग्रभागी आहे. कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते आणि कोल्हापूरच्या महापौर हसीना फरास यांच्या प्रमुख उपस्थितीत मानाच्या तुकाराम माळी तालीम मंडळाच्या गणपतीची पुजा करण्यात आली आणि त्यानंतर या मिरवणुकीला सुरुवात झाली.

Updated: Sep 5, 2017, 10:02 AM IST
कोल्हापुरच्या मानाच्या गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात title=

कोल्हापूर : कोल्हापुरात सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावर मानाच्या तुकाराम माळी तालीम मंडळाचा गणपती अग्रभागी आहे. कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते आणि कोल्हापूरच्या महापौर हसीना फरास यांच्या प्रमुख उपस्थितीत मानाच्या तुकाराम माळी तालीम मंडळाच्या गणपतीची पुजा करण्यात आली आणि त्यानंतर या मिरवणुकीला सुरुवात झाली.

पोलीस बँड आणि पारंपरिक वाद्यांच्या निनादात आणि ढोल ताश्याच्या गजरात ही मिरवणूक सुरु आहे. दरम्यान कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यानी डॉल्बी मुक्त गणेश विसर्जन मिरवणूक काढुन कोल्हापूरच्या लौकिकात भर घालावी अस आवाहन केलं आहे. कोल्हापूरात मोठ्या उस्तहात गणेश विसर्जन मिरवणूकीला सुरुवात झाली आहे.