कमरेचा करदोडा काढला आणि... नादुरुस्त झालेल्या शिवशाही बसमध्येच ST ड्राव्हयरने उचललं धक्कादायक पाऊल

ज्या बसचं स्टेअरिंग हातात असायचं त्यात बसमध्ये ST ड्रायव्हरने आपलं जीवन संपवल आहे. असं काय झाल की या ड्रायव्हरने इतका टोकाचा निर्णय घेतला. 

वनिता कांबळे | Updated: May 27, 2023, 06:54 PM IST
कमरेचा करदोडा काढला आणि... नादुरुस्त झालेल्या शिवशाही बसमध्येच ST ड्राव्हयरने उचललं धक्कादायक पाऊल title=

ST Shivshahi Bus Driver :  नादुरुस्त झालेल्या शिवशाही एसटी बसमध्ये चालकानं आत्महत्या केली आहे. नाशिकमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.  शिवशाही बसमध्ये चालकाने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. एसटी महामंडळ सध्या आर्थिक संकटात आहे. याचा फटका एसटी कर्मचाऱ्यांना सहन करावा लागत आहे. विशेषत: चालक आणि वाहकांमध्ये प्रचंड निराशेचे वातावरण आहे. 

कमरेच्या करदोड्याने गळफास घेतला.  

राजेंद्र ठुबे असं या चालकाचं नाव आहे. बसच्या पाठच्या सीटवर गळफास घेऊन त्यानं आत्महत्या केलीय. शिर्डी महामार्गावर पांगरी शिवारात ही घटना घडली आहे.  राजेंद्र ठुबे ज्या बसचे ड्रायव्हर होते ती बस नादुरुस्त होती. ही बस रस्त्यावरमध्येच बंद पडत होती. वारंवार बंद पडणाऱ्या बसमुळे ते त्रस्त झाले होते. याच बसमध्ये त्यांनी जीवन संपवले आहे.  

पंधरा दिवसांपूर्वीच झाले होते मुलाचे लग्न

आर्थिक कुचंबणा आणि वरिष्ठ एसटी अधिका-यांच्या जाचामुळं आमच्या वडिलांनी आत्महत्या केली असा आरोप ठुबे यांच्या मुलांनी केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे पंधरा दिवसांपूर्वीच ठुबे यांच्या मोठ्या मुलाचं लग्न झालं होते. वेळेवर पगार नाही आणि त्यात होत असलेल्या आर्थिक कुचंबणा आणि एसटी महामंडळातील अधिकाऱ्यांच्या जाचामुळे या आत्महत्या झाली असल्याची शक्यता त्यांच्या मुलांनी केली आहे. सातत्याने व्यवस्थापनाकडून होणारा छळ यामुळे ते त्रस्त होते. घरातील मोठ्या मुलाचं लग्न होऊन पंधरवाडा होत नाही तोच एसटी चालक असलेल्या वडिलांनी असे केल्याने संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीची मागणी होत आहे.

रात्रीच्या अंधारात बस चालक आणि प्रवाशांचा हा जीवघेणा प्रवास 

गडचिरोलीत एसटी ड्रायव्हरसह धक्कादायक प्रकार घडला होता.  हेडलाईट नादुरुस्त असतानाही एसटी महामंडळाची अहेरी आगाराची बस 40 प्रवाशांना घेऊन निघाली होती. रात्रीच्या अंधारात भर जंगलात बस चालक आणि प्रवाशांचा हा जीवघेणा प्रवास सुरु होता. चालकानं आगार प्रमुखांना फोन लावला आणि याबाबत तक्रार केली. एसटी नदीत फेकून दे असं उत्तर त्यांनी दिल्याचा आरोप बस चालकानं केला. या घटनेमुळे नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील एसटी महामंडळाचं धक्कादायक वास्तव उघड झाले. 

नादुरुस्त बसमुळे कर्मचाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवले

नादुरुस्त बसमुळे कर्मचाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा प्रकार परभणीच्या गंगाखेड आगारात घडला होता. आगारातील अनेक बस या नादुरुस्त असून अनेक बसचे स्पेअर पार्टस मिळत नसल्यामुळे देखिल या बस दुरुस्त होत नाहीत. त्याचा फटका कर्मचाऱ्यांसोबत राज्य परिवहन महामंडळाला बसत असल्याचं सांगण्यात आले. अनेक एसटी बसेस फार जुन्या झाल्याने वारंवार बंद पडत आहेत. एसटीच्या या बेभरवशी कारभाराचा प्रवाशांना आणि शालेय विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.  त्यामुळे एसटी महामंडळानं या नादुरुस्त बसेसची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी करण्यात येत आहे.