सोनु, तुला हेल्मेटवर भरोसा नाय काय ?

 मनोरंजन म्हणून सुरुवात झालेल्या सोनु, तुला भरोसा नाय काय ? या गाण्याने  राज्याचे समाजप्रबोधनही केले.

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Aug 5, 2017, 02:06 PM IST
सोनु, तुला हेल्मेटवर भरोसा नाय काय ? title=

नाशिक:  मनोरंजन म्हणून सुरुवात झालेल्या सोनु, तुला भरोसा नाय काय ? या गाण्याने  राज्याचे समाजप्रबोधनही केले.

यामध्ये आर.जे मलिष्का, राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांनी आपआपल्या स्टाईलमध्ये गायलेलं ‘सोनु सॉंग’ सुपरहिट ठरलं. आता एवढ सोनु, सोनु ऐकून तुम्ही कंटाळला असाल तर थोडं थांबा..कारण हे मजेशीर आणि समाज प्रबोधनात्मक गाण तुम्ही ऐकल नसेल. हे सोनु सॉंग कोणत्या सेलिब्रिटी अथवा राजकारण्याने गायलेलं नाहीए. तरीही लोकांची खुप पसंती याला मिळत आहे. नाशिकमधील चिमुरड्या पोरांनी त्यांच्या कोवळ्या आवाजात हेल्मेटची जगजागृती या गाण्याच्या माध्यमातून केली आहे.

“सोनू, तुला हेल्मेटवर भरोसा नाय काय?
सोनू, तू चालवतेस बुलेट,
बुलेटवर छान दिसते हेल्मेट,
हेल्मेटचा आकार कसा गोल गोल,
सोनू आता तरी तू पोलिसांशी गोड बोल..!”

शासनाने कितीही दंड आकारला तरीही बाईकस्वारांची विना हेल्मेट फिरण्याची हौस काय कमी होत नाही. अशा बाईकस्वारांना समजेल अशा भाषेत हेल्मेटचे महत्त्व सांगणारे इस्पॅलिअर एक्सपिरीमेंटल शाळेच्या विद्यार्थ्यांनी सोनू साँग तयार केले आहे. ते सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. हेल्मेटचा वापर किती महत्त्वाचा आहे हे सांगताना नियमांची आठवण करुन देणाऱ्या पोलिसांशी गोड बोल असा संदेशही ही बालके या ‘सोनु सॉंग’ मधून देत आहेत. व्हिडिओतील हे सर्व विद्यार्थी इस्पॅलियर शाळेतील असून त्यांचे संगीत शिक्षक जॅक्सन नाडे यांनी गीताचे शब्द लिहिले आहेत तर गाण्याची संकल्पना शिक्षण अभ्यासक सचिन जोशी यांनी केली आहे.

नाशिक पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल यांनाही संकल्पना आवडल्याने या गाण्याच्या माध्यमातून हेल्मेटचा वापर अधिकाधिक लोकांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सचिन जोशी यांनी सांगितले. या गाण्यामुळे अल्पावधितच स्टार झालेली 12 चिमुकली आहेत.  कैवल्य ओक, आदित्य खेडकर, अंतरा अहिरे, गौरी शिंदे, नेत्रा परदेशी, पृथ्वीराज परदेशी, उडान पगारे, शर्वरी महाले, सुधया घुले, हुरेन पटेल, काव्या बच्छाव आणि पालवी वरखेडे अशी या बाल कलाकारांची नावे आहेत.