स्मशानभूमीच्या बाजुने चाललेली गाडी, आत 27 मजूर; उलटली आणि पुढे जे घडलं....

Sonegav Accident: मजूर घेऊन जाणारे वाहन सोनेगाव स्मशानभूमीजवळ अनियंत्रित झाले.

Updated: May 12, 2024, 08:12 PM IST
स्मशानभूमीच्या बाजुने चाललेली गाडी, आत 27 मजूर; उलटली आणि पुढे जे घडलं.... title=
Sonegav Accident

Sonegav Accident: जिथे माणसांवर अंत्यसंस्कार होतात असं ठिकाण म्हणजे स्मशानभूमी. म्हणजे तसं हे शेवटचं ठिकाणं. त्यामुळे स्मशानभूमी म्हटली की एक वेगळी भीती माणसांच्या मनात असते. या स्मशानभूमीजवळ फारशी वस्ती नसते, रहदारी नसते. त्यामुळे याचे गूढ अधिकच वाढत जाते. त्यामुळे या ठिकाणी काही घटना घडल्या तर त्या अंधश्रद्धेशी जोडल्या जातात. पवनी तालुक्यातील सोनेगाव स्मशानभूमी चर्चेत आली आहे. 

मजूर घेऊन जाणारे वाहन सोनेगाव स्मशानभूमीजवळ अनियंत्रित झाले. त्यानंतर हे वाहन शेताजवळ उलटले. त्यात वाहनातील 27 मजुर बसले होते. त्यातील 14 मजुरांवर उपचार सुरू आहेत. आणि 2 गंभीर जखमी मजुरांना भंडार्‍याला हलविण्यात आले. जखमी मजुर हे अड्याळजवळील नेरला येथील असून सोनेगाव येथे धान कापणीला जात होते. 

जिल्ह्यात सर्वत्र उन्हाळी धान कापणी धडाक्यात सुरू आहे. शेतकरी हार्वेस्टर आणि मजुरांच्या सहाय्याने धान कापणी उरकून घेत आहेत.धान कापणीला मजुर मिळत नसल्याने दूरवरून वाहनाने मजुर नेऊन शेतीची कामे उरकून घेत आहेत. 

अवकाळी पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा, मात्र शेतकऱ्यांचे नुकसान

अड्याळ जवळील नेरला येथील 27 मजुर हे धान कापणीकरीता टाटाएस वाहनाने नेरला येथून सोनेगाव येथे जात होते. सोनेगाव स्मशानभूमीजवळ वाहनचालक मालक महेंद्र मुरकुटे याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. वाहन अनियंत्रित होवून शेतबांधित उलटले. त्यात वाहनातील 27 मजुर जखमी झाले आहेत. चांगली बातमी म्हणजे सर्व मजुरांचे प्राण वाचले. दरम्यान स्मशानभूमीजवळ घटना घडल्याने नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरु झाली होती.

मुख्यध्यापक व शिक्षकांनीच घेतली लाच, पालकांकडून 10 हजार घेणार इतक्यात...