लोकलच्या डब्यात दगड फेकला, तरूणी गंभीर जखमी

लोकलच्या प्रथम वर्गाच्या डब्यात दगड फेकल्यानं तरुणी गंभीर जखमी झालीय. 

Updated: Oct 5, 2018, 11:18 PM IST
लोकलच्या डब्यात दगड फेकला, तरूणी गंभीर जखमी title=

ठाणे : लोकलच्या प्रथम वर्गाच्या डब्यात दगड फेकल्यानं तरुणी गंभीर जखमी झालीय. मुंब्रा आणि दिवा स्थानकादरम्यान ही घटना घडलीय. रात्री ९ च्या सुमारास ही घटना घडलीय. (बातमीचा व्हिडीओ पाहा सर्वात खाली)

कांचन हटले नावाच्या तरुणीनं ठाण्याहून डोंबिवलीला जाणारी धिमी लोकल पकडली. लोकल मुंब्रा खाडी पुलाजवळ येताच अचानक मागील महिलांच्या प्रथम वर्गाच्या डब्यावर दगड भिरकवण्यात आला. त्यात कांचन जखमी झाली. 

या घटनेमुळे लोकलमध्ये एकच खळबळ उडाली. त्यानंतर कांचनला केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात आणि त्यानंतर खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. 

तिच्या चेह-यावर दगड जोरात आपटल्यानं तिचा ओठ फाटला असून दोन दात तुटलेत. रात्रीच तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. दोषींवर कारवाईची मागणी कांचनच्या आईने केलीय.