रत्नागिरीचाच हापूस हाच खरा हापूस आंबा

हापूस मूळ रत्नागिरीचाच असल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे. 

Updated: Oct 5, 2018, 11:08 PM IST
रत्नागिरीचाच हापूस हाच खरा हापूस आंबा title=
Pic : Suresh Prabhu @ twitter

रत्नागिरी : कोकणातील रत्नागिरी जिल्हा तसेच आजूबाजूच्या परिसरातील हापूस आंब्यावर अखेर जीओग्राफिकल इंडिकेशन टॅगची (GI Tag) मोहर उठलेय. यामुळे हापूस मूळ रत्नागिरीचाच असल्याचे आणि कोकणात पिकणारा हापूस हाच खरा हापूस असल्यावरही शिक्कामोर्तब झाले आहे. 

हापूस म्हटला की कोकण डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाही. मात्र तरीही  कोकणातल्या हापूसला आपली स्वतंत्र कायदेशीर ओळख नव्हती. आता ती अडचण आता दूर झालीय. हापूस हे ब्रॅण्ड वापरून इतर भागातील आंबा बागायतदारांना आता आंबा विकता येणार नाही. कारण आता कोकणातल्या हापूसला जीआय मानांकन मिळालंय. 

एखाद्या भागातील वस्तू त्याच भागत तयार होते ती त्याच भागातील आहे, म्हणून जीआय मानांकन दिलं जातं. तेच मानांकन आता कोणातील हापूसला मिळालंय. त्यामुळे इतर भागातील आंबा आता हापूस म्हणून विकत येणार नाही. २००८ साली जीआय मानांकन मिळावं म्हणून रत्नागिरीमधील आंबा बागायतदारांनी अर्ज केला होता. त्यानंतर त्याच्यावर हरकती मागवून सुनावणी घेऊन तब्बल 10 वर्षांनी कोकणातल्या जीआय मानांकन मिळालंय.  त्यामुळे इथल्या बागायतदार आणि विक्रेत्यांना फायदा होणार आहे.