सांगा मंत्री महोदय शिकायचं कसं? स्कूल बसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी कोंबून वाहतूक!

Solapur School Buses:  झी 24 तासने यासंदर्भातील धक्कादायक व्हिडीओ समोर आणलाय. यामुळे पाल्याच्या स्कूल बसकडे तुमचं लक्ष आहे का? असा प्रश्न पालकांना विचारला जातोय.

Pravin Dabholkar | Updated: Jul 5, 2024, 02:54 PM IST
सांगा मंत्री महोदय शिकायचं कसं? स्कूल बसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी कोंबून वाहतूक! title=
Solapur school buses

Solapur School Buses: विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करायला सोपं पडावं म्हणून पालत शालेय बसचा पर्याय निवडतात. पण ही शालेय बस विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळत असेल तर?  सोलापुरात असाच एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. शालेय बसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ खेळला जातोय. 'झी 24 तास'ने यासंदर्भातील धक्कादायक व्हिडीओ समोर आणलाय. यामुळे पाल्याच्या स्कूल बसकडे तुमचं लक्ष आहे का? असा प्रश्न पालकांना विचारला जातोय.

सोलापूर शहरातक्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी वाहनात कोंबून वाहतूक केली जात आहे. ही वाहतूक अत्यंत असुरक्षितपणे असून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ होतोय.

स्कूल व्हॅनवाल्यांचा विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ

अक्षरशः विद्यार्थ्यांना वाहनांमध्ये कोंबून, लटकवून जीवघेणा प्रवास करावा लागतोय, हे व्हिडीओ पाहून आपल्या लक्षात आले असेल. शालेय वाहतुकीचे सर्व नियम ढाब्यावर बसवले जातायत...आरटीओ आणि वाहतूक शाखेच्या पोलिसांचे याकडे साफ दुर्लक्ष होत असून, चार पैसे जास्त कमविण्यासाठी रिक्षाचालक, स्कूल व्हॅनवाले विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळतायत, असं चित्र दिसतंय. तसेच नेहमी सतर्क असणाऱ्या वाहतूक पोलिसांचे अशा स्कूल व्हॅनकडे दुर्लक्ष कसे होते? असा प्रश्नही विचारला जातोय. 

पाहा व्हिडीओ

'झी 24 तास'च्या कॅमेऱ्यात ही सर्व दृश्ये कैद झाली आहेत. आता तरी सोलापूर आरटीओ या स्कूल व्हॅन चालकांवर कारवाई करणार का ? याकडे सर्वांचे लक्ष आहे.