पुणे पोर्श अपघात प्रकरण: अल्पवयीन मुलाने बाल न्यायमंडळाकडे सादर केला 300 शब्दांचा निबंध

Pune Porsche Accident: कल्याणनगर प्रकरणातील अल्पवयीन मुलाने एका अटीची पूर्तता केली आहे. त्याने अखेर निबंध सादर केला आहे. 

Updated: Jul 5, 2024, 12:05 PM IST
 पुणे पोर्श अपघात प्रकरण: अल्पवयीन मुलाने बाल न्यायमंडळाकडे सादर केला 300 शब्दांचा निबंध title=
Minor in Porsche case complies with bail conditions writes 300 words essay on accident

Pune Porsche Accident: कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाकडून निबंध अखेर सादर करण्यात आला आहे. बाल न्यायमंडळात 300 शब्दांचा निबंध त्याने सादर केला आहे. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 10 दिवसांपूर्वीच उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुलाची सुटका करण्यात आली होती. त्यानंतर बाल न्याय मंडळाने जामीन मंजूर करताला घालून दिलेल्या तीन अटींपैकी एका अटीची पूर्तता अल्पवयीन मुलाने केली आहे. तर, अन्य दोन अटींची पूर्तता करणे अद्याप बाकी आहे. 

कल्याणीनगर परिसरात पोर्श कारने दोन जणांना धडक दिली होती. यात दोघांचाही मृत्यू झाला होता. पोर्शे कार ही अल्पवयीन तरुण चालवत असल्याचे समोर आले होते. तसंच, त्यावेळी त्यांनी मद्यप्राशनदेखील केल्याचे समोर आले आहे. अपघातानंतर अल्पवयीन मुलाला बाल न्याय मंडळाने सौम्य अटींसह जामीन मंजूर केला होता. त्यानंतर देशभरातून मोठ्या प्रमाणात टीकेचा सामना करावा लागला होता. प्रकरण तापल्यानंतर अल्पवयीन मुलाची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली होती. त्यानंतर आता अल्पवयीन मुलाने बाल न्याय मंडळाकडे निबंध सादर केला  आहे. 

बाल न्याय मंडळाने रस्त्यावरील अपघात आणि त्यावरील उपाययोजना या विषयावर निबंध सादर करण्याची अट बाल न्याय मंडळानेह जामीन मंजूर करताना घातली होती. तिची पूर्तता मुलाकडून करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अपघात प्रकरणातील आरोपीला काही अटी आणि शर्तींवर जामीन मंजूर करण्यात आला होता. त्यातील अजून दोन प्रमुख अटींची पूर्तता बाकी आहे.

दोन अटींची पूर्तता करणे अद्याप बाकी 

अल्पवयीन मुलाला रस्ते सुरक्षा विषयात परिवहन विभागासोबत देखील काम करावे लागणार आहे. त्याचप्रमाणे ससून हॉस्पिटलमध्ये मानसिक समुपदेशन घेणे अनिवार्य आहे. त्या दृष्टिकोनातून बाल न्याय मंडळ संबंधित विभागांना पुढील निर्देश देणार आहे. अपघातानंतर तब्बल एक महिना बालनिरीक्षण गृहात काढल्यानंतर 10 दिवसांपूर्वी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुलाची सुटका करण्यात आली आहे.

अपघात प्रकरण सर्वोच्च न्यायालयात?

पुणे कार अपघात प्रकरणी, राज्याच्या गृह विभागाने पुणे पोलिसांना  पोर्शे कार अपघातात सहभागी असलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलाच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या 25 जूनच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची परवानगी दिली. पोर्श कार अपघातात सहभागी असलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलाला सुधारगृहातून सोडण्याचे निर्देश देण्यात आले होते.