एकच खळबळ! शेतकऱ्यांनी खरंच जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात सोडला घातक प्राणी

कोल्हापूरातून एक विचित्र बातमी समोर येतय.  एका अज्ञात शेतक-यानं कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात साप सोडल्याची माहिती समोर येत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींच्या आवाहनानंतर या शेतक-यानं हे पाऊल उचललं आहे. 

Updated: Feb 27, 2022, 12:02 PM IST
एकच खळबळ! शेतकऱ्यांनी खरंच जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात सोडला घातक प्राणी title=

कोल्हापूर : कोल्हापूरातून एक विचित्र बातमी समोर येतय.  एका अज्ञात शेतक-यानं कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात साप सोडल्याची माहिती समोर येत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींच्या आवाहनानंतर या शेतक-यानं हे पाऊल उचललं आहे. 

कोल्हापुरात शेतीला रात्री वीज पुरवठा केला जातो. अशावेळी शेताला पाणी देताना साप, बिबट्या, गवा, अस्वल, रानडुक्कर यांसारखे जंगली प्राणी आढळल्यास त्यांना इजा न करता जिल्हाधिकारी तसंच तालुक्यातील सरकारी कार्यालयात  सोडा असं आवाहन राजू शेट्टींनी केलं होतं. 

राजू शेट्टींच्या या व्यक्तव्याला खरंच प्रतिसाद देत, एका शेतक-याने जीवंत साप जिल्हाधिकारी कार्यालयात सोडला. 

शेतीला दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी स्वाभीमानीनं आंदोलन केलं मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केलाय..