मुख्यमंत्र्यांचा गृहखात्यावर वचकच राहिला नाही: स्मिता पाटील

अनिकेत कोथळे हत्याप्रकरण हे पुरोगामी महाराष्ट्रातील दुर्दैवी घटना आहे. पोलीस रक्षक नसून भक्षक बनले आहेत. मुख्यमंत्र्यांचा गृहखात्यावर वचक राहिला नाही, अशा तीव्र भावना राज्याचे माजी गृहमंत्री आर आर पाटील यांच्या कन्या स्मिता पाटील यांनी व्यक्त केली आहे.

Updated: Nov 12, 2017, 11:38 PM IST
मुख्यमंत्र्यांचा गृहखात्यावर वचकच राहिला नाही: स्मिता पाटील title=

सांगली: अनिकेत कोथळे हत्याप्रकरण हे पुरोगामी महाराष्ट्रातील दुर्दैवी घटना आहे. पोलीस रक्षक नसून भक्षक बनले आहेत. मुख्यमंत्र्यांचा गृहखात्यावर वचक राहिला नाही, अशा तीव्र भावना राज्याचे माजी गृहमंत्री आर आर पाटील यांच्या कन्या स्मिता पाटील यांनी व्यक्त केली आहे.

जबाबदारी दुसऱ्यावर सोपवा

स्मीता पाटील यांनी झेपत नसेल तर, गृहखात्याची जबाबदारी दुसऱ्यावर सोपवावी अशी मागणीही केली आहे. सांगली पोलिसांनी खून केलेल्या, अनिकेत कोथळेच्या कुटुंबियांची भेट स्मिता पाटील यांनी घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी त्या बोलत होत्या.

चिमूकलीच्या प्रश्नाने पोलीस निरूत्तर

दरम्यान,  पोलिसांच्या मारहाणीत मृत्यूमूखी पडलेल्या अनिकेथ कोथळे यांच्या कुटूंबियांची भेट घेऊन कायदा आणि सुव्यवस्थेचे अप्पर पोलीस महासंचालक बिपीन बिहारी आणि कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी सांत्वन केले. या भेटीवेळी अनिकेतच्या कुटूंबियांनी विशेषत: त्यांच्या चिमूकलीने विचारलेल्या प्रश्नांमुळे पोलिसांवर तोंड लवविण्याची वेळ आली. तर, उपस्थितांचेही डोळे पाणावले. मम्मी पप्पाला मारुन आले का....?, असा हा आर्त सवाल चिमूकलीने विचारताच पोलिसांवर तोंड लवविण्याची वेळ आली. या प्रश्नाचे उत्तर ना पोलिसांकडे होते. ना उपस्थितांकडे.

गुन्ह्यात वापरलेली वाहने जप्त

सांगलीतील पोलिसांनी अनिकेतच्या खून प्रकरणात गुन्ह्यात वापरलेली तीन वाहनं जप्त केली आहेत. सीआयडीनं ही जप्तीची कारवाई केली असून अनिकेतच्या शरीराचे अवयव डीएनएसाठी पुण्यातील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.