रेल्वेकडून आणखी 6 गणपती विशेष गाड्या

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची गर्दी पाहता मध्य आणि कोकण रेल्वेकडून आणखी 6 विशेष ट्रेन चालविण्याचा निर्णय 

Updated: Aug 21, 2019, 09:13 PM IST
रेल्वेकडून आणखी 6 गणपती विशेष गाड्या  title=

देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची गर्दी पाहता मध्य आणि कोकण रेल्वेकडून आणखी 6 विशेष ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस, पनवेल, पुणे आणि सावंतवाडी रोड या स्थानकांसाठी विशेष ट्रेन चालविण्यात येणार आहेत.

पुणे-सावंतवाडी रोड- एलटीटी ( 2 फेऱ्या) ही  ट्रेन 29 ऑगस्टला पुण्याहून रात्री 12.10 वाजता सुटणार असून पहाटे 4 वाजता सावंतवाडी रोडला पोहचणार आहे. तर परतीच्या प्रवाशांसाठी सावंतवाडी रोड स्थानकातून सकाळी 5.20 वाजता सुटणार असून एलटीटीला दुपारी 4.50 वाजता पोहचणार आहे.

तर परतीच्या प्रवाशांसाठी  सावंतवाडी रोड स्थानकातून सकाळी 10.55 वाजता सुटणार असून पनवेलला रात्री 11.40 वाजता पोहचणार आहे. तर पनवेल-सावंतवाडी रोड- पुणे ( 2 फेऱ्या) ही  ट्रेन 31 ऑगस्टला पनवेलहुन मध्यरात्री 12.55 वाजता सुटणार असून दुपारी 2.10 वाजता सावंतवाडी रोडला पोहचणार आहे. 

तर परतीच्या प्रवाशांसाठी सावंतवाडी रोड स्थानकातून दुपारी 3.20 वाजता सुटणार असून पुणे स्थानकात सकाळी 7.25 वाजता पोहचणार आहे. 

या गाडीला रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, ;अरवली रोड ,संगमेश्वर रोड , रत्नागिरी , अडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधूदुर्ग, कुडाळ आणि झाराप या स्थानकात थांबा देण्यात  येणार आहे.