सिल्लोड येथील भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू

Sillod Road Aaccident : सिल्लोड तालुक्यातील भराडी महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू झाला आहे.  

Updated: Dec 30, 2021, 12:26 PM IST
सिल्लोड येथील भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू title=

औरंगाबाद : Road Aaccident at Sillod : सिल्लोड तालुक्यातील भराडी महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास झाला. भराडी रोडवर ऊसाचे ट्रॅक्टर रस्त्याचे कडेला नादुरुस्त अवस्थेत उभे होते. यावर छोटा टेम्पो आदळून हा अपघात झाला. (Six members of the same family die in a road accident at Sillod)

भराडी मार्गावर छोटा पीकअप भरधाव वेगाने जात होता. मात्र, रस्त्याच्या कडेला नादुरुस्त उभ्या असलेल्या ऊसाच्या ट्रॅक्टरला छोटा पीकअपची पहाटे 3 वाजता जोरदार धडक बसली आणि भीषण अपघात झाला.   छोटा पीकअप ही प्रवासी गाडी 6 लोकांना घेऊन चालली होती. अपघातात या लोकांचा जागीच मृत्यू झालाय. मृत व्यक्ती या मंगरूळ तालुका  सिल्लोड या गावचे आहेत. दरम्यान, मृतदेह सिल्लोड रुग्णालय येथे नेण्यात आले आहेत.

या अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये जिजाबाई गणपत खेळवणे ( 60) संजय संपत खेळवणे (42), संगिता रतन खेळवणे (35) लक्ष्मीबाई अशोक खेळवणे (45), अशोक संपत खेळवणे (52 ) सर्व रा मंगरुळ यांचा समावेश आहे.