नागपूर : Nagpur Thirty First Guideline : कोरोनाचा धोका वाढल्याने (Omicron Coronavirus) नवीन वर्ष स्वागत पार्ट्यांवर मुंबईनंतर आता नागपूरमध्येही बंदी घालण्यात आली आहे. (New Year Celebration) दरम्यान, राज्य सरकारकडून थर्टी फर्स्टसाठी नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. असे असले तरी नागपूरसाठी नवी नियमावली करण्यात आली आहे. येथे जमावबंदी लागू करण्यात आली आहे. (After Mumbai, ban on New Year welcome party on 31st December in Nagpur)
राज्यात कोरोनाचा (Corona) धोका वाढला आहे. तसेच परदेशातून आलेल्या व्यक्तींमुले काहींना ओमायक्रॉनची (Omicrone) बाधा झाली आहे. मुंबईत तर गेल्या 24 तासात दुप्पट कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. तर दुसऱ्या बाजूला लोकं थर्टी फर्स्ट आणि न्यू इअर सेलिब्रेशनच्या मूडमध्ये आहेत. या थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून नागपूरसाठी नवी नियमावली जाहीर केली आहे.
या नवीन नियमावलीनुसार नवीन वर्षाच्या पाटर्यावर बंदी असणार आहे. रात्री नऊ वाजल्यानंतर दुकाने बंद करावी लागणार आहे. रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत जमावबंदी असणार आहे. तर दुकाने आणि मॉल रात्री 9पर्यंत 50 टक्के क्षमतेसह सुरु राहतील.
तसेच सिनेमागृह, नाट्यगृह येथे शेवटचा शो रात्री नऊ वाजता 50 टक्के क्षमतेसह होईल. तर रेस्टॉरंट, उपहारगृहे रात्री 9 पर्यंत 50 टक्के क्षमतेसह सुरु राहतील. या नियमावलीचा भंग केल्यास त्यांना दंड ठोठावण्यात येणार आहे.