वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव : बनावट किल्लीचा वापर करून भावानेच सख्ख्या बहिणीचे दागिने आणि रोकड असा एकूण 51 हजार 500 रुपयांचा ऐवज लांब दिल्याचा धक्कादायक प्रकार जळगावात उघडकीस आला आहे. यात वडील आणि मुलगा हे दोघेही पोलिसांच्या नोंदणीतील गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले असून त्यांच्यावर या अगोदर देखील गुन्हे दाखल आहेत. भारत अनिल कुकरेजा याने असे आरोपीचे भावाचे नाव आहे
पवन हिरालाल लालवाणी हे कापड दुकान वर कामाला असून पत्नी खुशी आणि दोन वर्षाचा मुलगा यांच्या सिंधी कॉलनी येथे वास्तव्यात आहेत. काही दिवसांपूर्वी पत्नी मुलासह माहेरी गावाला गेली असताना. 20 ऑगस्ट रोजी पवन दुकानावर गेले. पैशांची गरज भासल्याने सायंकाळी घरी आले असता कपाटातील पत्नीचे 12 ग्रॅम वजनाचे पंचवीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे मनी मंगळसूत्र, दोन हजार रुपये किमतीचे सोन्याचे पान आणि 22 हजार 500 रुपये कपाटातून गायब झालेला होते.
दरम्यान हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पवन यांनी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल आला असून पवन लालवाणी यांच्याकडून कौटुंबिक माहिती जाणून घेत असताना भारत आणि सासरा अनिल यांचे गुन्हेगारी रेकॉर्ड निघाले. त्यानंतर अधिकच्या तपासात त्यांनीच बहिणीचे दागिने बनवाट किल्लीच्या सहाय्याने लंपास केल्याचे निष्पन्न झाले. भारत कुकरेजा काही दिवसांपासून बहिणीच्या घरी राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
भावाची गुन्हेगारी पार्श्वभूमीव असूनही त्याला घरात आश्रय दिल्याने तसेच त्याने बहिणीच्याही दागिन्यांची चोरी केल्याने, लालवाणी दांपत्यामध्ये कडाक्याचे भांडण झाले होते. अखेर पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे.