सिंधुदुर्गात पर्यटन महोत्सवाची धूम, पण अयोग्य नियोजनाचा त्रास

जिल्हा सध्या पर्यटकांच्या आगमनाने गजबजला आहे. जिल्ह्यात सध्या पर्यटन महोत्सवाचीही धूम सुरू आहे.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Dec 31, 2017, 02:35 PM IST
सिंधुदुर्गात पर्यटन महोत्सवाची धूम, पण अयोग्य नियोजनाचा त्रास title=

सिंधुदुर्ग : जिल्हा सध्या पर्यटकांच्या आगमनाने गजबजला आहे. जिल्ह्यात सध्या पर्यटन महोत्सवाचीही धूम सुरू आहे.

विशेषतः मालवण देवगड आणि विजयदुर्ग भागात सध्या मोठी गर्दी पहायला मिळते आहे. सध्या कुडाळमध्ये रोटरीचा महोत्सव सुरू आहे तर देवगड मध्ये जल्लोश उत्सव आणि विजयदुर्गमध्ये पर्यटन महोत्सव भरला आहे. याचाही पर्यटक आनंद घेत आहेत.

सिंधुदुर्गात आलेले पर्यटक इथल्या निसर्गा सोबतच मस्त मालवणी जेवणाचा आस्वाद घेत आहेत. मात्र पोलीस प्रशासन आणि स्थानिकांच्या अयोग्य नियोजनामुळे पर्यटकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो आहे.

पाहा व्हिडिओ